दिवसेंदिवस महागाईचा आलेख वाढत चालला आहे. याचा परिणाम सणांवर होत असून, वर्षातील पहिला सण असणाऱ्या मकर संक्रांत सणावर महागाईची संक्रांत आली की काय? असे जाणवत आहे. गोड बोलणे सोपे, पण तीळगूळ महाग, असे ग्राहक बोलताना दिसत आहेत. तर, दुसरीकडे गावरान तीळाला मागणी वाढल्याने तीळ उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे.
सूर्याच्या उत्तरायणाला सुरुवात होणारे मकर संक्रांतीचे पर्व स्नेह आणि चैतन्याचा संदेश देते. या दिवशी घरोघरी पूजन करून एकमेकांना वाटून 'तीळगूळ घ्या, गोड गोड बोला' अशा शुभेच्छा दिल्या जातात. त्यामुळे संक्रांतीनिमित्त तीळ आणि गुळाची, तसेच हलव्याची मागणी वाढते. तीळगूळ आणि हलव्याच्या किमतींमध्ये २० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे किती खरेदी करायचे, याचा विचार ग्राहक करत आहेत.
गावरान तिळाला मागणी; पण...
बाजारात गावरान तिळाला मागणी होती. बीडलगतच्या ग्रामीण भागातून शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेल्या गावरान तिळाला २४० ते २५० रुपये भाव मिळाला, परंतु हे प्रमाण अत्यंत कमी होते. तिळाचा पेरा दिवसेंदिवस घटल्याने तिळाच्या दरात तेजी आली, तर किराणा दुकानांमध्ये राजस्थान भागातून आलेल्या तिळाचे भाव २४० ते २५० रुपये होते.
पाच साखर कारखान्यांच्या क्षेत्रातही गुळाची गोडी वाढली, शेतकऱ्यांची गूळ उद्योगाला पसंतीगजक, फ्लेवर रेवडीला मागणी
तिळाचे तीळ लाडू रेवडी मकर संक्रांतनिमित्त राजस्थानच्या ब्यावर, जयपूर, भिलवडा भागातून विविध उत्पादकांचे गजक विक्रीला उपलब्ध आहेत. ३६० ते ४०० रुपये किलो गजकचा भाव आहे. तर तिळाची चिक्की १०० रुपयांत ४०० ग्रॅम होती. रोज व इतर फ्लेवरच्या रेवडीचा भाव २८० ते ३०० रुपये किलो होता.