भातसानगर : गेल्या वर्षी भातालासरकारने १७०० रुपये भाव, त्यात बोनस असा २ हजार १०० रुपये क्विंटल हमीभाव जाहीर केला होता. त्या तुलनेत वर्षभर भाताचे भाव वाढत असतात. वाढलेल्या दराचा शेतकऱ्यांना काहीच उपयोग होत नाही.
शेतकऱ्यांकडे विकण्यासाठी भातच नसतो. ज्यावेळी भात असतो, त्यावेळी भाव नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडते. त्यामुळे बाजारभाव वाढले तरी शेतकऱ्याचा खिसा मात्र रिकामाच अशी स्थिती आहे.
गेल्या आठवड्यात तांदळाला क्विंटलला उच्चांकी भाव मिळत आहे. गेल्या चार दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. असेच ऊन पडले तर उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
गेल्या चार वर्षांचे भाताचे हमीभाव
वर्ष | दर | बोनस |
२०२० | १४०० | ४०० |
२०२१ | १६२० | २०० |
२०२२ | १७५० | २०० |
२०२३ | १८५० | ४०० |
सध्या बाजारात भाताची आवक नसल्याने तांदळाच्या किमतीत दरवाढ होण्याची शक्यता आहे. सणात तांदळाची मागणी वाढत असल्याने थोडीफार दरवाढ होते. - रमेश अग्रवाल, व्यापारी
सध्या शेतकऱ्यांकडे भात नाहीच. आपल्याजवळील भात शेतकऱ्यांनी विकला तर काही आपल्यासाठी भरडून आणला. काही भात बियाणे म्हणून वापरला. मग आता त्याच्याकडे काहीच भात नाही. आता भाताच्या किमती वाढल्या तरी त्याचा त्याला काहीच फायदा नाही. - किशोर खांबाळकर, शेतकरी, लाहे