Lokmat Agro >बाजारहाट > Rice MSP बोनससह भात विक्रीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

Rice MSP बोनससह भात विक्रीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

Rice MSP; along with the bonus amount of rice sale is credited to the farmer's account | Rice MSP बोनससह भात विक्रीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

Rice MSP बोनससह भात विक्रीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

खरीप हंगामात जिल्ह्यात भाताचे मुख्य पीक असून, ७० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येते. अनेक शेतकरी शासनाच्या हमीभावाचा फायदा घेत भात विक्री करतात.

खरीप हंगामात जिल्ह्यात भाताचे मुख्य पीक असून, ७० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येते. अनेक शेतकरी शासनाच्या हमीभावाचा फायदा घेत भात विक्री करतात.

शेअर :

Join us
Join usNext

रत्नागिरी : शेतकऱ्यांनी उत्पादित भाताची विक्री (₹) केलेला भात विक्री करता यावी, यासाठी हमीभाव देण्यात येतो. यावर्षी शासनाकडून २१८३ रुपये प्रतिक्विंटलला भाव देण्यात आला. तसेच २०० रुपये प्रतिगुंठा बोनस शेतकऱ्यांना देण्यात आला. शेतकऱ्यांनी भात विक्रीनंतरचे पैसे व बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे.

खरीप हंगामात जिल्ह्यात भाताचे मुख्य पीक असून, ७० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येते. अनेक शेतकरी शासनाच्या हमीभावाचा फायदा घेत भात विक्री करतात. गतवर्षीच्या हंगामात एकूण १९९८ शेतकऱ्यांनी ४४६८१.२० क्विंटल भात विक्री केली. नवीन भात लागवडीची तयारी शेतकरी करत आहे.

ऑनलाइन नोंदणी
भात विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागते. शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करताना सातबारा, आठ अ, बँक खाते, आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे.

दरवर्षी होते दरात वाढ
■ भाताला शासनाकडून देण्यात येणाऱ्या दराच्या रकमेत दरवर्षी वाढ केली जाते. शिवाय बोनसही दिला जातो.
■ भात विक्रीनंतर काही दिवसांतच शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाइन रक्कम जमा केली जाते.
■ १४ केंद्रावर भात खरेदी केली जाते.

भाव वाढणार का?
नवीन हंगामात भात पेरणीची तयारी सुरू झाली आहे. भात काढणीनंतर विक्रीसाठी नोंदणी करावी लागते. यावर्षी भाताच्या हमीभावात वाढ होणे अपेक्षित आहे.

९७ कोटी खात्यावर
जिल्ह्यातील १९९८ शेतकऱ्यांच्या खात्यावर ९७ कोटी ५३ लाख ९ हजार ५९ भात विक्रीची, तर चार कोटी ८९ लाख ९९ हजार ५८० रुपये बोनसची रक्कम जमा झाली आहे.

सर्वाधिक भाव दोन हजार
गतवर्षी भाताला चांगला हमीभाव मिळाला. प्रति क्विंटल २१८३ रूपये दर देण्यात आला. शिवाय गुंठ्यांला दोनशे रूपये प्रमाणे बोनसची रक्कम देण्यात आला. विक्रीनंतरची रक्कम शिवाय बोनसचे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत.

दरवर्षी शेतकऱ्यांसाठी भात खरेदी योजना राबविण्यात येते. त्यासाठी शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. भात काढणीनंतर खरेदी विक्री सुरू करण्यात येते. - पी. जे. टिले, अधिकारी, दि मार्केटिंग फेडरेशन, रत्नागिरी

Web Title: Rice MSP; along with the bonus amount of rice sale is credited to the farmer's account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.