Join us

बाजारात संकेश्वर मिरची ब्रँडचा दबदबा कायम; कसा मिळतोय बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 9:52 AM

दरवर्षी मिरचीच्या दराची झळ सर्वांना बसते. मात्र यंदा पाऊस कमी झाल्याने मिरची पीक जोमदार आले आहे. गतवर्षीपेक्षा यावेळी बाजारपेठेत २० टक्क्यांनी मिरचीचा दर कमी झाला आहे.

दरवर्षी मिरचीच्या दराची झळ सर्वांना बसते. मात्र यंदा पाऊस कमी झाल्याने मिरची पीक जोमदार आले आहे. गतवर्षीपेक्षा यावेळी बाजारपेठेत २० टक्क्यांनी मिरचीचा दर कमी झाला आहे. सध्या उन्हाळा सुरू झाल्याने वर्षभराच्या चटणीची तजवीज करण्यासाठी संकेश्वर बाजारपेठेत मिरची घेण्यास महिलांनी सुरूवात केली आहे.

संकेश्वर मिरची ही मुख्यतः परिसरातील हत्तरवाट, कमतनूर, नेर्ली, आमणगी, निडसोशी, व्हन्नीहळ्ळी, कणंगला, हरगापूर, अंकले गावांच्या शेतात केली जाते. संकेश्वर साधी, पायशीचे तर संकेश्वर जवारी चवळी ही गडहिंग्लजनजीकच्या बहिरेवाडी, सुळे, माद्याळ येथे उत्पादित होते. या मिरची पिकाला 'संकेश्वर मिरची' नावानेच ओळखले जाते.

जेवणाची लज्जत वाढण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगलीहून संकेश्वर चवळी मिरचीला मागणी अधिक आहे. लांब, बारीक, स्वाद, रंग, तिखटपणा हे या मिरचीचे वैशिष्ट्य आहे. विशेषतः उत्पादन कोठेही असले तरी 'संकेश्वर मिरची' ब्रँडचा दबदबा बाजारात टिकून आहे.

मिरचीचे नाव व दर प्रति किलो (रुपये)गरुडा  - १६०लवंगी - २२५ब्याडगी - २००साधी संकेश्वरी - २००संकेश्वर पायशी - ४००संकेश्वर जवारी चवळी - १०००

टॅग्स :मिरचीबाजारमार्केट यार्डकोल्हापूरपुणेसांगलीपाऊस