नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत संत्रीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सोमवारी २७६ टन आवक झाली.
होलसेल मार्केटमध्ये ३० ते ६० तर किरकोळ मार्केटमध्ये ६० ते १०० रुपये किलो दराने संत्रीची विक्री होत आहे. हिवाळ्यामध्ये चवीला गोड असलेल्या फळांची आवक कमी होते.
रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ग्राहकांकडूनही लिंबूवर्गीय फळांची मागणी वाढते. सध्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही सर्वाधिक आवक संत्रीचीच होत आहे.
६० ते १०० रुपये किलो
■ नागपूर व इतर परिसरातून तिची आवक होत असून, संपूर्ण मार्केटमध्ये संत्रीचा सुगंध दरवळत आहे. सोमवारी २७६ टन संत्री, ८६ टन मोसंबी, ११२ टन कलिंगड, १५० टन पपई व ७२ टन सफरचंदाची आवक झाली.
■ संत्रीला बाजार समितीमध्ये ३० ते ६० रुपये किलो बाजारभाव मिळत असून, किरकोळ मार्केटमध्ये दर्जाप्रमाणे ६० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत विक्री होत आहे.
■ पुढील काही दिवस तिची आवक जास्त राहील, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
अधिक वाचा: एका झाडापासून आठ ते नऊ क्विंटल उत्पादन देणारी चिंचेची नवीन जात; वाचा सविस्तर