सध्या राज्यात गहू काढणी होत असून बाजारसमितीमध्ये लोकल, शरबती, बन्सी अशा वेगवेगळ्या जातींची आवक होत आहे. पुण्यात सध्या शरबती गव्हाची चलती असून क्विंटलमागे इतर बाजारसमितींच्या तूलनेत अधिक दर मिळत आहे.
शरबती गव्हाला क्विंटलमागे ४५०० ते ५००० रुपयांचा भाव मिळत असून शेतकऱ्यांचा विक्रीकडे कल वाढला आहे. इतर ठिकाणी गव्हाला २५०० ते ३२०० रुपये असा बाजारभाव मिळत आहे.
राज्यात आज सकाळच्या सत्रात ४७४ क्विंटल गव्हाची आवक झाली. आज ईदमुळे बाजारसमितीत आवक घटली आहे. पुण्यात शरबती गव्हाला क्विंटलमागे सर्वसाधारण २००० ते ४५०० रुपयांचा भाव मिळत आहे.
हिंगोलीसह बुलढाणा, नांदेड, नाशिक, पालघर, यवतमाळ बाजारसमितीमध्ये गव्हाला साधारण ४५०० ते ५२०० रुपये भाव मिळत आहे.
जाणून घ्या पुण्यात मागील चार दिवसांपासून शरबती गव्हाचा भाव
११ एप्रिल- ४६०० ते ५२०० रुपये क्विंटल१० एप्रिल- ४५०० ते ५०००९ एप्रिल- ४७०० ते ५२००८ एप्रिल- ४६०० ते ५२००