Join us

Shevga Market Rate : बाजारात शेवगा खातोय का भाव? वाचा सविस्तर शेवगा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 21:20 IST

Drumstick Market Rate Today : राज्यात आज ३८ क्विंटल शेवगा आवक झाली होती. ज्यात पुणे येथे १९, खेड-चाकण १५, जुन्नर-ओतूर ४ क्विंटल आवक होती.

कडाक्याच्या थंडीमुळे आवक घटल्याने पालेभाज्या स्वस्त झाल्या आहेत. मात्र, फळभाज्या महागल्या आहेत. ८० ते ९० रुपये किलो मिळणारा शेवगा सध्या ४०० ते ५०० रुपयांपर्यंत गेला आहे. तर ६० ते ७० रुपये महिन्यापूर्वी मिळणारी गवार आता १७० रुपयांच्या पुढे गेली आहे, कोथिंबीर व मेथी मात्र स्वस्त झाली आहे. थंडी आणि वातावरणातील बदलामुळे पालेभाज्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.

राज्यात आज ३८ क्विंटल शेवगा आवक झाली होती. ज्यात पुणे येथे १९, खेड-चाकण १५, जुन्नर-ओतूर ४ क्विंटल आवक होती. शेवग्यास आज खेड-चाकण येथे कमीत कमी १२००० तर सरासरी १३००० दर मिळाला. यासोबतच पुणे येथे १५००० व जुन्नर-ओतूर येथे १०००० सरासरी दर मिळाला.

साधारण नोव्हेंबरमध्ये नवीन भाजीपाल्याची लागवड होते. डिसेंबर व जानेवारीमध्ये नवीन भाजी येते. मग दर कमी होऊ लागतात, टोमॅटो, कांदा, गवारीचे दर वाढले आहेत. लसूण देखील किरकोळ बाजारात ४०० रुपये किलो आहे. - अलिम बागवान, फळ व भाजी विक्रेते, करमाळा.

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील शेवगा आवक व दर  

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/12/2024
खेड-चाकण---क्विंटल15120001400013000
पुणेलोकलक्विंटल1950002500015000
जुन्नर -ओतूरलोकलक्विंटल450001551010000
टॅग्स :बाजारभाज्याशेतकरीमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती