Silk Cocoon Market : बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये रेशीम कोषांची विक्रमी आवक होत आहे. ऑक्टोबरमध्ये दररोज सरासरी १०० ते ३०० किलो रेशीम कोषांची आवक झाली.
दिवाळी पाडव्यापासून मागील पाच दिवसांमध्ये ४३ हजार ६९२ किलो रेशीम कोषाची आवक झाली. शेकडो शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील रेशीम कोष विक्रीसाठी आणले होते.
रेशीम कोषाला कमाल भाव ५६० ते ५८० रुपये प्रति किलोप्रमाणे मिळाला. सरासरी भाव ४८० ते ५०० रुपये प्रति किलोपर्यंत राहिले. रेशीम कोषांचे लॉट पाहून उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याचे दिसते.
४- ७ नोव्हेंबर दरम्यान जालना बाजार समितीमध्ये रेशीम कोषाची आवक किती झाली ते वाचा सविस्तर
शेतमाल : रेशीम कोष
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
07/11/2024 | ||||||
जालना | पांढरा | क्विंटल | 5 | 31000 | 50000 | 46500 |
06/11/2024 | ||||||
जालना | पांढरा | क्विंटल | 12 | 29000 | 52500 | 49000 |
05/11/2024 | ||||||
जालना | पांढरा | क्विंटल | 16 | 30000 | 51000 | 48000 |
04/11/2024 | ||||||
जालना | पांढरा | क्विंटल | 19 | 31500 | 45500 | 42000 |
(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)