Join us

भाव नसल्याने कोथिंबीर लागवडीचा खर्चही निघेना, बाजारात दर गडगडले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 10:22 AM

आता कोथिंबिरसह शेतमाल दर घसरले आहेत. त्यामुळे पिकास केलेला उत्पादन खर्चही पदरी पडतो का नाही, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उजेड येथील तरुण बेरोजगारीला कंटाळून शेतीकडे वळले आहेत. पारंपरिक पद्धतीने शेती परवडत नसल्याने नवीन उमेद घेऊन आधुनिक शेतीकडे वळून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी धडपड करीत आहेत.

मात्र, सोयाबीन, तूर, हरभरा, ज्वारी, या पिकांना बाजारात भाव नसल्यामुळे उजेड येथे अनेक तरुण फूलशेती, भाजीपाला शेती, तथा कोथिंबीर लागवडीकडे वळले आहेत. मात्र, भाव नसल्याने लागवड खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे हाताशी आलेले पीक कवडीमोल दराने विक्री करावे लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

मालास कवडीमोल दर...

उजेड परिसरातील अनेक तरुणांनी एकत्र येत समूह शेतीचा प्रयोग सुरु केला आहे. त्यातून फुले, दुग्ध व्यवसाय करण्यात येत आहेत. यात सुरुवातीला चांगले उत्पन्न मिळाले आहे.

मात्र, आता कोथिंबिरसह शेतमाल दर घसरले आहेत. त्यामुळे पिकास केलेला उत्पादन खर्चही पदरी पडतो का नाही, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

राज्यात कसा मिळतोय कोथिंबीरीला दर

16/04/2024
कोल्हापूर---क्विंटल2015002500
पुणे-मांजरी---नग5432538
छत्रपती संभाजीनगर---नग19600500600
पाटन---नग120001012
खेड---नग9000300500
राहता---नग1200515
हिंगणा---क्विंटल420003000
कल्याणहायब्रीडनग31015
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल1725252815
रामटेकहायब्रीडक्विंटल718001900
सोलापूरलोकलनग8837300500
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल12020002250
जळगावलोकलक्विंटल2610002000
पुणे- खडकीलोकलनग100067
पुणे -पिंपरीलोकलनग14001010
पुणे-मोशीलोकलनग245001011
नागपूरलोकलक्विंटल32020002750
मुंबईलोकलक्विंटल86712001400
भुसावळलोकलक्विंटल5112001500
कामठीलोकलक्विंटल1230003400

 

 

टॅग्स :बाजारशेती