सोलापूर : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसह विविध बाजारपेठांत सीताफळांची आवक मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे.
शहरातील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीसह विविध बाजारपेठांत सीताफळांची आवक मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. परिणामी सीताफळ स्वस्त झाले आहेत.
सततच्या पावसाचा सीताफळ बागांना एकीकडे फटका बसला तर दुसरीकडे डोंगरातील सीताफळांना याचा फायदा झाला. बाजारात सध्या गावरान सीताफळांची आवक चांगली होत आहे.
वातावरणात थंडी हळूहळू वाढू लागली असून, सीताफळांचा गोडवाही वाढू लागला आहे. थंडी हळूहळू वाढू लागली असून, सीताफळांचा गोडवा वाढू लागला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी ५४७ क्विंटल आवक झाली. उच्च प्रतीच्या सीताफळाला क्विंटलमागे चार हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला, तर बाजारात ३० ते ६० रुपये प्रति किलोदराने त्यांची विक्री होत आहे.
गावरान सीताफळ अधिक
गेल्या वर्षी गावरान सीताफळाची आवक कमी होती. तर, गोल्डन सीताफळाची आवक जास्त होती. या वर्षी मृग बहरात सीताफळांना जुलै महिन्यात फुले येतात. नेमक्या याच काळात संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे फळधारणा होण्याच्या प्रमाणात घट झाली. त्यामुळे सीताफळ बागांचे उत्पादन घटले. म्हणून बाजारात गोल्डन सीताफळ कमी प्रमाणात असल्याचे फळ व्यापारी यांनी सांगितले.
हाडांसाठी फायदेशीर
सीताफळात लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस हे घटक असल्याने हाडांसाठी हे फळ अतिशय फायदेशीर असते. थंडीच्या दिवसांत हाडे दुखण्याचे किंवा सांधेदुखीचे प्रमाण वाढते. त्यावर सीताफळ खाणे फायदेशीर ठरते.