Lokmat Agro >बाजारहाट > Sitafal Bajarbahv : यंदा हिवाळ्याचे सीताफळ पावसाळ्यातच लवकरच सुरु झाली आवक कसा मिळतोय दर

Sitafal Bajarbahv : यंदा हिवाळ्याचे सीताफळ पावसाळ्यातच लवकरच सुरु झाली आवक कसा मिळतोय दर

Sitafal Bajarbahv: This year, winter sitafal has started early in the rainy season | Sitafal Bajarbahv : यंदा हिवाळ्याचे सीताफळ पावसाळ्यातच लवकरच सुरु झाली आवक कसा मिळतोय दर

Sitafal Bajarbahv : यंदा हिवाळ्याचे सीताफळ पावसाळ्यातच लवकरच सुरु झाली आवक कसा मिळतोय दर

सीताफळ म्हटलं की अनेकांची जीभ तोंडातल्या तोंडात हळूच रेंगाळते. रसाळ व मधुर फळ असलेल्या सीताफळाला नैसर्गिक आइस्क्रीम म्हणूनही ओळखले जाते.

सीताफळ म्हटलं की अनेकांची जीभ तोंडातल्या तोंडात हळूच रेंगाळते. रसाळ व मधुर फळ असलेल्या सीताफळाला नैसर्गिक आइस्क्रीम म्हणूनही ओळखले जाते.

शेअर :

Join us
Join usNext

सोलापूर : सीताफळ म्हटलं की अनेकांची जीभ तोंडातल्या तोंडात हळूच रेंगाळते. रसाळ व मधुर फळ असलेल्या सीताफळाला नैसर्गिक आइस्क्रीम म्हणूनही ओळखले जाते. प्रामुख्याने हिवाळ्यात दाखल होणारे सीताफळ बाप्पांच्या आगमनानंतरच बाजारपेठेत दाखल होणार आहे.

त्यामुळे आणखीन काही दिवस सीताफळ खाणाऱ्या लोकांना वेट अॅण्ड  वॉचच्या भूमिकेत बसावे लागणार आहे. सीताफळाचा हंगाम जुलै ते नोव्हेंबरपर्यंत असतो. सुरुवातीला १ ते ३ टन आवक सुरू असून, सप्टेंबरमध्ये ४० ते ८० टन आवक वाढते.

खाण्यास रुचकर आणि आरोग्यवर्धक असलेल्या सीताफळांची येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी ११ क्विंटल आवक झाली. उच्च प्रतीच्या सीताफळाला क्विंटलमागे सात हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला, तर किरकोळ बाजारात ६० ते १०० रुपये प्रतिकिलोदराने त्यांची विक्री होत आहे.

सीताफळाची आवक सांगोला, वैराग, बार्शी, मंगळवेढा या स्थानिक भागातून होत आहे. २६ ऑगस्ट रोजी बाजारात सीताफळाला क्विंटल मागे सात हजार रुपये भाव मिळाला असून, आवक अधिक वाढल्यास दर कमी होतील, असे विक्रेत्यांनी सांगितले.

काय म्हणतात सोलापूरचे व्यापारी
हिवाळी फळे म्हणून प्रसिद्ध असलेले सीताफळ, पेरूचा हंगाम असला, तरी पुरेशी आवक बाजारात नाही. सध्या सीताफळाचे सीझन असले, तरी ते हव्या तितक्या प्रमाणात बाजारात उपलब्ध होत नाही. पुढील आठवड्यापासून सीताफळ आणि बोराची आवक वाढून ती डिसेंबरपर्यंत कायम राहील, असे फळ व्यापाऱ्याने सांगितले.

बोरांची आवकही झाली सुरू
बोरांची आवकही बाजार सुरू झाली असून, सोमवारी ६ क्चिटल आवक झाली असून, क्विटलमागे सरासरी दर तीन हजार रुपयाचा दर मिळाला आहे. डाळिंबाचे मृगबहार व आंबे बहार असे दोन हंगाम असतात. आंबे बहार या बहारात फळे एप्रिल ते ऑगस्टपर्यंत मिळतात, तर मृग बहाराची फळे ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत मिळतात. गतवर्षीच्या तुलनेत यंदा डाळिंबाची आवक कमी आहे. आवक अशीच कमी राहिली, तर दिवाळीपर्यंत दर तेजीत राहतील असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Sitafal Bajarbahv: This year, winter sitafal has started early in the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.