Join us

आता ‘लोकमत ॲग्रोवर’ शेतकऱ्यांना मिळतात स्मार्ट बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 6:18 PM

शेतमालाचे आजचे बाजारभाव स्मार्ट पद्धतीने शेतकऱ्यांना ‘लोकमत ॲग्रो’च्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत.

कांदा, टोमॅटो असो की सोयाबीन, कापूस…शेतमालाचे आजचे बाजारभाव काय? आणि ते एकत्रित मिळतील कुठे असा शेतकरी बांधवांना नेहमीच प्रश्न पडतो. आता ‘लोकमत ॲग्रो डॉट कॉम’ने आपल्या पोर्टलवर ताजे बाजारभाव , तेही स्माटे पद्धतीने उपलब्ध करवून दिले आहेत. त्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सौजन्य लाभले आहे.

लोकमत ॲग्रोच्या पोर्टलला भेट दिल्यावर सुरुवातीलाच ताजे बाजारभाव ठळकपणे पाहता येतात. मोबाईलद्वारे लोकमत ॲग्रो डॉट कॉम पाहत असाल, तर बाजारभावांच्या ठिकाणी उजच्या हाताला असलेल्या बाणांच्या मदतीने ताजे शेतमाल भाव पाहायला मिळतात. शेतमालानुसार, बाजारसमितीनुसार, शेतमालाच्या प्रकारानुसार जर बाजारभाव शोधायचे असेल, तर उजव्या कोपऱ्यात वरती ‘सर्च’ वर जाऊन क्लिक केले की शेतकऱ्यांना चार छोटे पर्याय दिसून येतील. त्यात हवा तो पर्याय निवडला की बाजारभाव पाहता येतील.

समजा कांद्याचे बाजारभाव पाहायचे असतील, तर ‘मार्केट टाईप’वर भाजीपाला पर्याय निवडावा लागतो. त्यानंतर शेजारी ‘शेतमालाचे नाव’ या पर्यायात कांदा किंवा हव्या त्या भाजीपाला निवडाला की उपलब्ध बाजारसमितीत काय भाव मिळतोय त्याची माहिती शेतकऱ्यांना लगेच वाचता येईल. याच पद्धतीने फळे, फुले, कडधान्य, तेलबिया, धान्य हे पर्याय निवडून शेतमालाचे भाव समजू शकतात. याशिवाय कुणाला बाजारसमितीनुसार शेतमालाचे भाव जाणून घ्यायचे असतील, तर तोही पर्याय उपलब्ध आहे.

बाजारभाव विश्लषणाची स्मार्ट सोय लोकमत ॲग्रो डॉट कॉमच्या बाजारभावांचे वैशिष्ट्य म्हणजे बाजारभावांचे जागेवरच विश्लेषण. म्हणजेच कालच्या बाजारभावांपेक्षा आजचे बाजारभाव कमी की जास्त त्याची माहिती शेतकऱ्याला लगेच कळते. त्यासाठी   प्रत्येक शेतमालाच्या बाजारभावाशेजारी कंसात लाल आणि हिरव्या रंगात एक अंक दिसतो. लाल अंक म्हणजे कालच्यापेक्षा आज बाजारभावात किती रुपयांनी घट झाली त्याचा रुपयांतील फरक.

हिरवा अंक म्हणजे कालच्या पेक्षा आज बाजारभावात किती रुपयांनी वाढ झाली आहे, त्यातील रुपयांतील फरक. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारभाव समजण्यात अधिकाधिक स्पष्टता येणार असून अशी ही तांत्रिक सोय पहिल्यांदाच शेतकऱ्यांना उपलब्ध होत आहे.

अधिक माहितीसाठी भेट द्या लोकमत ॲग्रोची वेबसाईट www.lokmatagro.com

टॅग्स :बाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्डशेतकरीशेती