बाजार समितीमध्ये ज्वारीची आवक कमी असल्याने ज्वारीची दरवाढ झाली आहे. यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे ज्वारी पिकाच्या उत्पन्नात घट झाली, त्यामुळे ज्वारीला मागणी वाढली असून चांगला भाव मिळत असल्याने ज्वारी उत्पादक शेतकरी आनंदात आहेत. सांगली बाजार समितीमध्ये सोमवारी ज्वारीला कमीत कमी प्रतिक्चिटल ६५०० रुपये, तर जास्तीत जास्त ७५०० रुपये दर मिळाला आहे.
सर्वाधिक दर सांगली बाजार समितीत
ज्वारीची आवक कमी असल्याने बाजार समितीत प्रतिक्चिटल ७ हजार ५०० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे ज्वारी विक्री करणे परवडत असल्याचे सांगितले जात आहे. माल विक्री करून हूँ क्टरभाडे, आइत, हमाली अशी सर्व रक्कम वजा केली तर कमी रक्कम मिळते.
ज्वारीचा कोणत्या बाजार समितीत काय दर? (प्रतिक्विंटल रुपयांत)
बाजार - समिती दर
सांगली - ७५००
आटपाडी - ६९००
विटा - ७१५०
इस्लामपूर - ७२००
खुल्या बाजारात आठ हजारांवर दर
ज्वारीला होलसेल भाव सहा हजार ५०० ते सात हजार ५०० रुपये विचटलला दर मिळत आहे. पण, किरकोळ विक्रेते त्यापेक्षाही जादा दराने म्हणजे प्रतिक्विंटल ८ हजार २०० रुपयांनी विक्री करत आहेत.
शेतकऱ्यांच्या पदरात निम्मेपण पडेनात
खुल्या बाजारात आठ हजारांपेक्षा जास्त भाव दिला जातो. तरीही बाजार समितीत फक्त सहा ते सात हजारांचा दर आहे. सध्या जो ज्वारीला विक्रमी भाव मिळत आहे, त्याचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही. साठेबाजी केलेल्या व्यापाऱ्यांच्या मालाची विक्री होत आहे. शेतकरी मात्र रिकामाच आहे. - संदीप शिंदे, शेतकरी
शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी आल्यानंतर कधीच भाव मिळत नाही. यामुळे सध्या ज्वारीला मिळत असलेल्या भाव शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांच्याच फायद्याचा आहे. शेतकऱ्यांची ज्वारी येण्यास तीन महिने लागणार आहेत. तोपर्यंत महागड्या भावानेच ज्वारी घ्यावी लागणार आहे. - मारुती जाधव, शेतकरी.