Join us

Sorghum Market Update : तुम्ही ज्वारी खरेदीची नोंदणी ऑनलाइन केली का; काय आहे शेवटची तारिख? वाचा सविस्तर  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 7:27 PM

शासनाने ज्वारी खरेदीसाठी नाफेड अंतर्गत आधारभूत किमती ठरवून खरेदी सुरू केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंद करणे गरजेचे आहे. त्यासाठी शेवटची तारीख ३१ ऑगस्ट आहे.  (Sorghum Market Update)

शासनाने ज्वारी खरेदीसाठी नाफेड अंतर्गत आधारभूत किमती ठरवून खरेदी सुरू केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंद करणे गरजेचे आहे. त्यासाठी शेवटची तारीख ३१ ऑगस्ट आहे. 

अमरावती  जिल्ह्यातील आतापर्यंत ८३ हजार ५५१ क्विंटल उन्हाळी ज्वारीची खरेदी करण्यात आली. यामध्ये खरेदी केलेल्या ज्वारीचे ९.८० कोटींचे चुकारे अद्याप शासनाने दिलेले नाहीत. त्यामुळे आर्थिक अडचणीतील शेतकरी प्रतीक्षेत आहेत.

किमान आधारभूत खरेदी योजनेत जिल्ह्यात उन्हाळी ज्वारीची खरेदी नऊ तालुक्यातील खरेदी-विक्री संघामार्फत करण्यात येत आहे. जिल्ह्यात यावर्षी उन्हाळी ज्वारीचा पेरा वाढला. शासनानेही ३ हजार १८० रुपये क्विंटल असा हमीभाव दिलेला आहे.

त्यातुलनेत खासगीमध्ये २००० ते २ हजार २०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांची धाव शासन खरेदी केंद्रांकडे आहे. विशेष म्हणजे, शासनानेही जिल्ह्याचे लक्ष्यांक दोन वेळा वाढवून दिले व खरेदीसाठी ३१ ऑगस्ट ही अंतिम मुदत दिली.

अमरावती जिल्ह्यात २७ जूनपर्यंत ३ हजार ६९२ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यातुलनेत २६ ऑगस्टपर्यंत २ हजार ४४७ शेतकऱ्यांची ८३ हजार ५५१ क्विंटल ज्वारी खरेदी केली गेली. शासनाने वाढीव ६१ हजार क्विंटलचे टार्गेट दिल्याने जिल्ह्यात १.६१ लाख क्विंटल ज्वारीची खरेदी शासनमान्य दराने होणार आहे. 

ज्वारी खरेदी अमरावती जिल्हा

आतापर्यंत झालेली खरेदी८३ हजार ५५१
क्विंटल हमीभावाने होणारी रक्कम२६,५६,९५१०५ रु. 
शासनाकडून प्राप्त रक्कम१६,७६,३३,२२३ रु. 
वाटप केलेली रक्कम१६,६२,७३,५८३ रु.
शासनाकडून अप्राप्त रक्कम

९,८०,६१,८८२ रु.

ज्वारीची तालुकानिहाय खरेदी

जिल्हा विपणन अधिकारी यांच्या माहितीनुसार अमरावती तालुक्यात २,१६१ क्विंटल, अचलपूर २७,१८२ क्विंटल, दर्यापूर ७,७६८ क्विंटल, नांदगाव २,४०६ क्विंटल, मोर्शी १०,२९५ क्विंटल, अंजनगाव सुर्जी १४,९१५ क्विंटल, चांदूरबाजार ११,८७६ क्विंटल, तिवसा ४,०३१ क्विंटल व चांदूर रेल्वे तालुक्यात २,९१४ क्विंटल ज्वारीची खरेदी केली गेली.

बुलढाणा जिल्ह्यात काय परिस्थिती 

आता ज्वारी खरेदीसाठी अवघे चार दिवस राहिले असून शेतकऱ्यांचीही ज्वारी विक्रीसाठी धावपळ होत आहे. एकीकडे बुलढाणा जिल्ह्यात ज्वारीचा पेरा कमी होत असतानाच बाजारातही ज्वारीला अपेक्षित भाव मिळत नव्हता.

मात्र नाफेड अतंर्गत ३ हजार १८० रुपये प्रतिक्विंटल हमी भावाने ज्वारी खरेदी करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना क्विंटलमागे सुमारे ८०० रुपये अधिक मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड  अंतर्गत ज्वारी देण्यास प्राधान्य दिले होते.विशेष म्हणजे नाफेड अंतर्गत जिल्ह्याला तीन वेळा उद्दिष्ठ बदलून देण्यात आले होते. त्यातच किमान आधारभूत किमतीमध्ये ज्वारी खरेदीला मुदतवाढ देण्यासोबतच ८५ हजार क्विंटलचे अतिरिक्त उद्दिष्ठ देण्यात आले होते.

त्यामुळे नोंदणी केलेल्या बहुतांश शेतकऱ्यांची ज्वारी नाफेड अंतर्गत खरेदी करण्यास वेळ मिळाला होता. त्यासाठी शेतकऱ्याचा वाढलेला रेटा पाहता ३१ जुलै रोजी थांबवलेली खरेदी प्रक्रियेला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रातील अवर सचिव मोहनलाल यांच्याशी संपर्क साधत अमरावती विभागासाठी अतिरिक्त ज्वारी खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.

त्यानुषंगाने राज्य शासनास केंद्राकडून पत्र देण्यात आल्यानंतर ही मुदत वाढ मिळाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. प्रामुख्याने जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, खामगाव आणि मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी यासंदर्भाने मागणी केली होती.

२८ कोटींचे चुकारेही दिले

मधल्या काळात नाफेड अंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या ९० हजार क्विंटल ज्वारीचे २८ हजार ६२ लाख रुपयांचे चुकारेही देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

५३ कोटींचे चुकारे बाकी

'नाफेड' अतंर्गत खरेदी करण्यात आलेल्या उर्वरित १ लाख ६७ हजार ९३९ क्विंटल ज्वारीचे ५३ कोटी ४० लाख ४६ हजार २० कोटी रुपयांचे चुकारे अद्याप देणे बाकी आहे. ज्वारी खरेदीची प्रक्रिया पूर्णत्वास गेल्यानंतर लगोलग हे चुकारे देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

या केंद्रांवर झाली खरेदी

बुलढाणा, मेहकर, खामगाव, साखरखेर्डा, लोणार, जळगाव जामोद, चिखली, मोताळा, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, मलकापूर (२), संग्रामपूर, नांदुरा, वरवंड बकाल, बिबी आणि आसलगाव या केंद्रांवरही ज्वारीची खरेदी झाली आहे. दरम्यान, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी प्रसंगी ४ हजार ७४४ शेतकरी हे वंचित राहण्याची शक्यता आहे.

बुलढाणा जिल्ह्याचे यंदाचे उद्दिष्ट

खरेदीचे उद्दीष्ट३,०३,००० क्विं
झालेली खरेदी २,५७,९३९ क्विं
चुकारे दिले २८ कोटी ६२ हजार
खरेदी   ४५,००० क्विं.
शेतकरी संख्या१४,१४३
खरेदी झाली९,३९९

बारदानाही उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. उर्वरित शेतकऱ्यांचे चुकारे शासनाकडून लवकरच प्राप्त होणार आहेत. - अजय बिसने, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, अमरावती

टॅग्स :शेती क्षेत्रज्वारीबाजारमार्केट यार्डशेतकरीशेती