गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा, तूर या धान्यांच्या दरात अवघ्या एक महिन्यात पाचशे ते हजारांची मोठी वाढ झाली आहे. या धोरणात शेतकरी कंगाल, तर व्यापारी मालामाल होणार आहे.
सध्या उन्हाळी हंगाम सुरू आहे. शेतकरीवर्गाची शेतातील उभी पिकं अवकाळी पावसाच्या पहिली काढणी करून मार्केटमध्ये घालण्याची धावपळ जवळपास संपल्यात जमा आहे.
या उन्हाळी गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा, तूर ही पिकं यावर्षी शेतकऱ्यांना दिलासा देऊन गेली. या पिकांत शेतकऱ्यांना चांगले हवामान कमी रोगराई व योग्यवेळी पाऊस पडल्याने भरघोस उत्पादनही मिळाले.
उसाला पर्यायी पिकाकडे वाढलेला ओढा शेतकऱ्यांना दिलासा देऊन गेला आहे. शेतकऱ्यांनी फेब्रुवारी व मार्च या महिन्यात या पिकांची मळणी करून काहींनी हे धान्य सरळ मार्केटला लावले, तर काहींनी घरीच ठेवणे पसंद केले.
ज्या शेतकऱ्यांनी मार्केटला लावण्याची गडबड केली त्यांना गहू ३००० ते ३४०० दर मिळाला. ज्वारी ३१०० ते ३५०० दर मिळाला. हरभरा २२०० ते २७०० रुपये दर मिळाला. तुरीला ४५०० ते ५००० दर मिळाला होता.
अनेक शेतकऱ्यांनी मार्केट पेक्षा घरगुती विक्रीला प्राधान्य दिले. आत तोलाई, मोलाई, हमाली व तूट असे अंदाजे १०० ते १५० रुपये क्विंटलला शेतकऱ्यांचे वाचले आहेत.
आता एका महिन्यात या धान्यांचे भाव वाढून ते क्विंटलला ५०० ते १००० रुपयांनी वाढल्याचे दिसत आहे. शेतकऱ्याचा मालाची सध्या आवक कमी झाली आहे. याचाच फायदा आता व्यापारी उठवायला सुरू करत आहेत. मार्केटमध्ये सध्या गहू ४२०० ते ४५०० झाला ज्वारी ४००० ते ४३०० झाली.
हरभरा ३००० ते ३५०० हजारांवर पोहोचला आहे. तूर ५००० ते ६००० पर्यंत पोहोचली आहे. महिन्यात शेतकरी कंगाल, तर व्यापारी मालामाल होणार यात शंका नाही. हे दर दोन चार महिन्यांत पाचशे ते एक हजारांनी वाढले तर नवल वाटायला नको.
अधिक वाचा: धान्याला कीड लागू नये म्हणून धान्य साठवताना करा हे सोपे उपाय