सोयाबीनचे दर वर्षभरात ३,९०० रुपये क्विंटलवर स्थिरावले असताना, शेतकऱ्यांजवळचे सोयाबीन आता संपले आहे. अशा परिस्थितीत २ एप्रिलला अमरावती येथील बाजार समितीमध्ये अधिकतम ४,४०० रुपये भाव मिळाला आहे. चांगल्या प्रतवारीच्या कापसाचे भाव यंदा पहिल्यांदा ७,७७५ रुपयांवर पोहोचला आहे.(Soyabean, cotton)
शासनाने ४,८९२ रुपये क्विंटल हमीभाव जाहीर केला होता. प्रत्यक्षात खासगी बाजारात मातीमोल भाव असताना शासनाने हंगाम सुरू झाल्याच्या दोन महिन्यांनंतर केंद्रांवर नोंदणी व त्यानंतर महिनाभराने खरेदी सुरू केली व खरेदीमध्ये मंदगती असल्याने शेकडो शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी राहिली आहे.(Soyabean, cotton)
दरम्यान, नाफेडचे (NAFED) पेमेंट विलंबाने मिळत असल्याने आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात सोयाबीन बाजार समित्यांमध्ये विकले आहे. काहींनी साठवणूक केली. मात्र, चार महिन्यांनंतरही सोयाबीनची दरवाढ होत नसल्याने सोयाबीनची विक्री केली.(Soyabean, cotton)
शेतकऱ्यांना दरवाढीचा फारसा फायदा नाही
सद्यस्थितीत २० टक्के शेतकऱ्यांजवळ साठवणूक केलेले सोयाबीन नाही. त्यामुळे २०० रुपयांनी दरवाढ झालेली असली तरी शेतकऱ्यांना फारसा फायदा झालेला नाही.
सरकीला उठाव, पांढऱ्या सोन्याची दरवाढ
दोन आठवड्यांपासून देशांतर्गत सरकीची मागणी वाढली आहे. उन्हाळ्यात सरकीची मागणी दरवर्षी वाढते. या पार्श्वभूमीवर कापसाच्या दरात ३०० ते ४०० रुपयांनी वाढ झाली आहे.
सीसीआयद्वारा २४ मार्चपासून कापसाची खरेदी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. यावर्षी कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता नसल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.
सरकीची मागणी वाढल्याने चांगल्या प्रतवारीच्या कापसाचे दर काही प्रमाणात वाढले आहेत. स्थानिक मार्केटचा हा फरक आहे. - संजय जाजू, व्यापारी
कापसाचे स्थानिक भाव (रु./क्विं)
१२ मार्च | ७,१२५ ते ७,४५० |
१७ मार्च | ७,१५० ते ७,५०० |
२१ मार्च | ७,२५० ते ७,५७५ |
२४ मार्च | ७,२७५ ते ७,६०० |
२६ मार्च | ७,२५० ते ७,५७५ |
२९ मार्च | ७,३५० ते ७,७७५ |