Join us

Soyabean Market : सोयाबीनची आवक वाढली, मागील आठवड्यात काय भाव मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 5:05 PM

Soyabean Market :

Soyabean Market : मागील आठवड्यात लातूर बाजारात सोयाबीनची (Soyabean Market) सरासरी किंमत ४ हजार ५८२ प्रति क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतीत १.५ टक्के घट झाली आहे. सध्या लातूर बाजारात सोयाबीनच्या किंमती या किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहेत.

मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनची (Soyabean Bajarbhav) आवकमध्ये राष्ट्रीय पातळीवर ४९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात देशातील आवक 80.0 टनांच्या वर गेली आहे. तर राज्यात 20 टनांच्या वर गेली आहे. नव्या सोयाबीनच्या काढणीला काहीअंशी सुरवात झाल्याने आवक वाढत असल्याचे चित्र आहे. 

सोयाबीनची खरीप हंगाम (Kharif Season) २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत रु.४८९२ प्रती क्विटल जाहीर करण्यात आलेली आहे. मागील आठवड्यात प्रमुख बाजारपैकी  लातूर बाजारात सरासरी किंमत ४५८२ इतकी होती. तर अकोला बाजारात सरासरी किंमत ४३५७ रुपये प्रति क्विंटल होती. मध्य प्रदेशातील इंदोर बाजारात ४ हजार ५१८ रुपये, अमरावती बाजारात ४ हजार ४८४ रुपये तर वाशीम बाजारात ४ हजार ३८३ रुपये बाजारभाव मिळाला.

आजचा सोयाबीन बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

21/09/2024
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल8445044504450
राहूरी -वांबोरी---क्विंटल7470047004700
पाचोरा---क्विंटल210371140243911
कारंजा---क्विंटल4200405046704530
सेलु---क्विंटल65425045854351
तुळजापूर---क्विंटल45460046004600
राहता---क्विंटल13445046404500
सोलापूरलोकलक्विंटल538385046554445
अमरावतीलोकलक्विंटल3630455046104580
नागपूरलोकलक्विंटल158422544504394
अमळनेरलोकलक्विंटल30400040004000
हिंगोलीलोकलक्विंटल819430046464473
मेहकरलोकलक्विंटल1260410046204500
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल155450046414551
अकोलापिवळाक्विंटल3013400046854375
चिखलीपिवळाक्विंटल295410046004350
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल900445046504500
उमरेडपिवळाक्विंटल354400046504300
भोकरदनपिवळाक्विंटल32455047004600
भोकरपिवळाक्विंटल59399544604227
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल96440045504475
मलकापूरपिवळाक्विंटल261405046114400
सावनेरपिवळाक्विंटल12410042004160
दर्यापूरपिवळाक्विंटल900350046354450
देउळगाव राजापिवळाक्विंटल70400045004400
टॅग्स :सोयाबीनशेती क्षेत्रमार्केट यार्डअमरावती