Lokmat Agro >बाजारहाट > Soyabean Market : बाजारात आवक वाढतीच; सोयाबीनच्या दरात आणखी घसरण होणार का?

Soyabean Market : बाजारात आवक वाढतीच; सोयाबीनच्या दरात आणखी घसरण होणार का?

Soyabean Market: Inflows into the market continue to increase; Will soybean prices fall further? | Soyabean Market : बाजारात आवक वाढतीच; सोयाबीनच्या दरात आणखी घसरण होणार का?

Soyabean Market : बाजारात आवक वाढतीच; सोयाबीनच्या दरात आणखी घसरण होणार का?

दिवाळीच्या (Diwali) तोंडावर बाजार समितीत (Market Yard) आवक वाढत असताना सोयाबीनच्या दरात (Soybean Market) आणखीनच घसरण होण्याची शक्यता बाजारतज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.

दिवाळीच्या (Diwali) तोंडावर बाजार समितीत (Market Yard) आवक वाढत असताना सोयाबीनच्या दरात (Soybean Market) आणखीनच घसरण होण्याची शक्यता बाजारतज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

वाशिम : दिवाळीच्या तोंडावर बाजार समितीत आवक वाढत असताना सोयाबीनच्या दरात आणखीनच घसरण होण्याची शक्यता बाजारतज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. सोयापेंडेच्या दरात घसरण झाल्याने सोयाबीनच्या दरावर परिणाम झाला असून, येत्या काही दिवसांत आवक वाढल्यास सोयाबीनचे दर आणखीनच घसरण्याची शक्यताही बाजारतज्ज्ञांनी वर्तविली आहे.

सद्यःस्थितीत राज्यात सोयाबीनची काढणी वेगात सुरू असून, सोयाबीनच्या उत्पादनात यंदा ३ टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे बाजारात यंदा सोयाबीनची आवक अधिक राहणार आहे. सद्यःस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर प्रति क्विंटल ३ हजार २४ रुपये एवढे, तर सोयापेंडेचे दर २ हजार ६०४ रुपये प्रती क्विंटल आहेत. अर्थात भारताच्या तुलनेत जागतिक बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडेचे दर खूप कमी आहेत. त्यामुळे आयात वाढण्याचा धोका आहे. अशात सोयाबीनचे दर येत्या काही दिवसांत आणखीनच घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

केंद्राने सोयाबीनचे दर वाढविण्यासाठी कच्च्या खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ केली. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाहीच, उलट तेलाचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र कात्री बसत असून, तेलाचे दर दिवाळीच्या तोंडावर आणखी वाढण्याचीही भीती व्यक्त होत आहे.

सोयाबीनला बाजारात कोठे किती कमाल दर

वाशिम४४४५ 
बुलढाणा४४००
वर्धा४५००
अमरावती४४११
अकोला४५३०
चंद्रपूर४४००
जळगाव४४००
यवतमाळ४४४० 
सांगली४९००
लातूर४४९१

'या' लिंक वर क्लिक करून आजच आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा, आणि मिळवा सर्व अपडेट सर्वात आधी अगदी मोफत.

Web Title: Soyabean Market: Inflows into the market continue to increase; Will soybean prices fall further?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.