Join us

Soyabean market price: आज कुठल्या बाजारसमितीत सोयाबीनला जास्त बाजार भाव मिळाला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 6:07 PM

Today's soyabean market rates and soyabean market prices. आजचे सोयाबीन बाजार भाव जाणून घ्या

आज दिनांक २८ मे २४ रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये पांढरा, पिवळा, हायब्रीड आणि लोकल सोयाबीन वाणाला सरासरी ३९०० ते ४२०० रुपये प्रति क्विंटल इतका भाव (soyabean market rate) मिळाला. हा बाजार भाव हमी भावापेक्षा कमी आहे.

मागील आठवड्यात लातूर बाजारात सोयाबीनची सरासरी किंमत रु.४५५० प्रती क्विटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात किंमतीत ०.३ टक्के घट झाली आहे.

मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबींनची आवकमध्ये राष्ट्रीय पातळीवर ९ टक्केनी घट झाली आहे. खरीप हंगाम २०२३-२४ साठी किमान आधारभूत किंमत रु. ४६०० प्रती क्विटल आहे. असे विश्लेषण स्मार्ट प्रकल्पाच्या अखत्यारित येणाऱ्या बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षाने केले आहे.

गतवर्षी सोयाबीन बाजारपेठेत दाखल होताच, पाच हजारांच्या पुढे भाव मिळाला होता. त्यांनतर आता जवळपास आठ ते दहा महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी सोयाबीनचे भाव हमीभावापेक्षा कमीच आहेत. 

खरीप हंगाम तोंडावर आला असल्यामुळे शेतकऱ्यांना पैशांची जुळवाजुळव करावी लागत आहे. सोयाबीनला मिळणाऱ्या भावातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. दहा वर्षांपूर्वी सोयाबीनला चार हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. 

राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमधील सोयाबीनचे बाजारभाव असे आहेत

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

28/05/2024
राहूरी -वांबोरी---9280142513900
सिल्लोड---25445045004500
कारंजा---3500415044954325
मुदखेड---6430043004300
राहता---1451145114511

पिंपळगाव(ब)

- पालखेड

हायब्रीड320435145414500
अमरावतीलोकल6558432544204372
नागपूरलोकल644410044354351
हिंगोलीलोकल930419044704330
कोपरगावलोकल196420045004410
अंबड (वडी गोद्री)लोकल39350044504000
मेहकरलोकल930400044804300
लासलगाव - निफाडपांढरा207410045094470
अकोलापिवळा3498400044854300
अकोटपिवळा665360043604300
चिखलीपिवळा480410044704285
हिंगणघाटपिवळा4137280046003800
वाशीम - अनसींगपिवळा300420046004500
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळा21450046004550
भोकरपिवळा8425142514251
हिंगोली- खानेगाव नाकापिवळा71423043504290
गेवराईपिवळा45437143894380
परतूरपिवळा12430045264400
गंगाखेडपिवळा27450046004500
दर्यापूरपिवळा700340044454350
देउळगाव राजापिवळा17440044004400
वरोरापिवळा443375043804000
वरोरा-खांबाडापिवळा20300041003700
नांदगावपिवळा23425045024450
अहमहपूरपिवळा1018360145164389
चाकूरपिवळा48337044784338
औराद शहाजानीपिवळा319450045114505
पुर्णापिवळा68440044814452
नेर परसोपंतपिवळा354309544554278
बाभुळगावपिवळा600410045304380
राजूरापिवळा75430043254315
काटोलपिवळा95401144334250
सिंदीपिवळा155385044504250
देवणीपिवळा13450046204560
टॅग्स :सोयाबीनपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजार