Join us

Soyabean MSP : सोयाबीनच्या हमीभावात दहा वर्षात किती वाढ झाली? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 7:25 PM

Soyabean Hamibhav : सद्यस्थितीत बाजारात हमीभावापेक्षा कमीच भाव आहे. मागील दहा वर्षात सोयाबीनची किमान आधारभूत किंमत कशी बदलत गेली ते पाहुयात... 

Soyabean MSP : भारत सरकारनं 2023-24 च्या खरिप हंगामात (Kharif Season) सोयाबीनला प्रती क्विंटल 4 हजार 600 रुपये इतका हमीभाव जाहीर केला. 2024-25 मध्ये हमीभावात (Crop MSP) वाढ करुन तो 4,892 एवढा करण्यात आला आहे. सरकारकडून जाहीर केलेला हमीभाव (किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP) यालाच बोलीभाषेत हमीभाव म्हटलं जातं. सद्यस्थितीत बाजारात हमीभावापेक्षा कमीच भाव आहे. मागील दहा वर्षात सोयाबीनची (Soyabean Market MSP) किमान आधारभूत किंमत कशी बदलत गेली ते पाहुयात... 

सोयाबीन (Soyabean) हे भारतातील इतर तेलबिया व नगदी पिकाप्रमाणे महत्त्वाचे नगदी पीक आहे. महाराष्ट्रातील खरीप हंगामातील अत्यंत महत्त्वाचे शेंगवर्गीय तेल बिया पीक म्हणून सोयाबीनची ओळख आहे. सोयाबीन पिकाची साधारणता 15 ते 17 लाख हेक्टर वर  लागवड केली जाते. यात विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वाधिक लागवड केली जाते. त्यामुळे सोयाबीन पिकाचा मोठा शेतकरी वर्ग असल्याने सोयाबीनची एमएसपी नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहे. मागील दहा वर्षांचा विचार केला तर जवळपास 2 हजार 332 रुपयांची वाढ किमान आधारभूत किमतीमध्ये झाल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे मात्र बाजार समित्यांमध्ये बाजारभावामध्ये कमी अधिक किमती असल्याचे चित्र आहे.

दरम्यान 2013-14 मध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ही 2560 रुपये होती 2014-15 मध्ये आदल्या वर्षा इतकीच म्हणजे 2560 रुपये होती. तर 2015-16 मध्ये 40 रुपयांची वाढ करून 2600 रुपये करण्यात आली. 2016-17 मध्ये यात 175 रुपयांची वाढ करून हमीभाव 2775 रुपये करण्यात आला. 2017 18 मध्ये पुन्हा 75 रुपयांची वाढ करून हमीभाव तीन हजार पन्नास रुपये करण्यात आला पुढील वर्षी म्हणजेच 2017-18 मध्ये हमीभाव तीन हजार 50  रुपये, 2018-19 मध्ये 3399 रुपये करण्यात आला. 

त्यानंतर 2019-20 मध्ये 3710 रुपये, 2020-21 मध्ये 3880 रुपये, 2021-22 मध्ये तीन हजार 950 रुपये, त्यानंतर मागील वर्षी म्हणजेच 2023-24 मध्ये चार हजार सहाशे रुपये हमीभाव करण्यात आला आणि यंदा म्हणजेच 2024-25 या खरीप हंगामात 4892 रुपये हमीभाव करण्यात आला आहे. त्यामुळे मागील दहा वर्षांचा विचार केला तर जवळपास 2332 रुपये हमीभावात वाढ करण्यात आलेली आहे. मात्र दुसरीकडे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये मात्र हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याचं चित्र आहे. 

टॅग्स :सोयाबीनशेती क्षेत्रमार्केट यार्डमराठवाडाविदर्भ