Join us

Soybean Bajar Bhav : सोयाबीनची आवक घटली ; हा मिळाला भाव वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 18:29 IST

राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला सर्वसाधारण दर काय मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav)

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (१ डिसेंबर) रोजी बाजारातसोयाबीनची आवक ७२३ क्विंटल झाली. तर त्याला ३ हजार ९८८ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. मागील दोन दिवसांपासून बाजारात सोयाबीनची आवक घाटताना दिसत आहे.

आज (१ डिसेंबर) रोजी पिवळा,  लोकल जातीच्या सोयाबीनची आवक झाली. बुलढाणाच्या बाजारात पिवळा जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक ६०० क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ३ हजार ७२५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमीत कमी दर हा ३ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त दर हा ४ हजार १५१ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

पिंपळगाव(ब) येथील औरंगपूर भेंडाळी बाजारात सोयाबीनची आवक कमी १६ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ३ हजार ८५१ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर  किमान दर हा  ३ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल दर हा ४ हजार २४० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजारात सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला सर्वसाधारण दर काय मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/12/2024
सिल्लोड---क्विंटल69400042504200
राहूरीलोकलक्विंटल38415042004175
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल16370042403851
बुलढाणापिवळाक्विंटल600330041513725

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तरGarlic Farming : लसूण शेतीसाठी खत आणि पाणी व्यवस्थापनाचे तंत्र समजून घ्या, वाचा सविस्तर https://www.lokmat.com/agriculture/smart-farming/latest-news-understand-fertilizer-and-water-management-techniques-for-lasun-garlic-farming-read-in-detail-a-a993/

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड