Join us

Soybean Bajarbhav : एकीकडे लागवड तर दुसरीकडे मागच्या हंगामातील विक्री! सोयाबीनला किती मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 4:41 PM

Todays Market Soybean Rates : मागच्या हंगामातील सोयाबीन अजूनही शेतकऱ्यांच्या घरात असून दर वाढण्याच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी साठवून ठेवली आहे. पण मागच्या सात ते आठ महिन्यांपासून सोयाबीनचे दर कमीच असल्याने शेतकऱ्यांना तोटा होत आहे.

Maharashtra Soyabean Bajarbhav : यंदाच्या हंगामातील खरीप पेरण्या आणि लागवडी जवळपास पूर्ण होत असून मान्सूनच्या पावसाची (Monsoon Rain) प्रतीक्षा शेतकर्‍यांना आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी मागच्या हंगामातील सोयाबीन अजूनही साठवून ठेवली आहे. दर वाढण्याच्या आशेने ठेवलेली सोयाबीन शेतकऱ्यांना मिळेल त्या दरात विक्री करावी लागत आहे. 

दरम्यान, आज राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक झाली आहे. तर अमरावती, अकोला आणि वाशिम बाजार समितीमध्ये (Market Yards) सर्वांत जास्त सोयाबीनची आवक झाली होती. वाशिम बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे ३ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. या बाजार समितीमध्ये ४ हजार ३५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. (Market Yard Soybean Rates Latest Updates)

आजच्या कमाल आणि किमान दराचा विचार केला तर आज हिंगणघाट बाजार समितीमध्ये (Hinganghat Market Yard) ३ हजार ७०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून हा दर आजच्या दिवसातील किमान दर होता. तर औराद शहाजानी बाजार समितीमध्ये आजच्या दिवसांतील सर्वांत जास्त म्हणजे ४ हजार ४९७ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. (Today's Detailed Soybean Rates)

दरम्यान, मागच्या हंगामात सोयाबीनला ४ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल हा हमीभाव (Crop MSP) केंद्र सरकारने जाहीर केला होता पण हमीभावापेक्षा कितीतरी कमी दर सोयाबीनला मिळत आहे. मागच्या हंगामातील सोयाबीन जवळपास ८ महिने साठवून ठेवल्यानंतरही शेतकऱ्यांना हवा तेवढा दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये (Farmers) नाराजी आहे. 

आजचे सविस्तर सोयाबीनचे दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/06/2024
राहूरी -वांबोरी---क्विंटल7410041004100
तुळजापूर---क्विंटल50445044504450
राहता---क्विंटल2440044004400
धुळेहायब्रीडक्विंटल4380042503800
अमरावतीलोकलक्विंटल1413435044224386
नागपूरलोकलक्विंटल208410044754381
अमळनेरलोकलक्विंटल2430043004300
हिंगोलीलोकलक्विंटल650410045054302
अकोलापिवळाक्विंटल1764400045054300
मालेगावपिवळाक्विंटल13379944164326
बीडपिवळाक्विंटल17446044604460
वाशीमपिवळाक्विंटल3000422544504350
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल300400045254400
भोकरदनपिवळाक्विंटल13440045004450
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल300428044854385
मलकापूरपिवळाक्विंटल435389044514375
सावनेरपिवळाक्विंटल5420042004200
आंबेजोबाईपिवळाक्विंटल120439945584500
अहमहपूरपिवळाक्विंटल259420045414460
चाकूरपिवळाक्विंटल35380044514276
औराद शहाजानीपिवळाक्विंटल191449045054497
उमरगापिवळाक्विंटल1430043004300
नेर परसोपंतपिवळाक्विंटल148350044404230
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल293400044004350

 

 

टॅग्स :मार्केट यार्डबाजारसोयाबीन