Join us

Soybean Bajarbhav: सकाळच्या सत्रात या बाजारसमितीत सोयाबीनचा दर क्विंटलमागे मिळतोय एवढा दर

By मुक्ता सरदेशमुख | Published: June 15, 2024 2:01 PM

सकाळच्या सत्रात ४ हजार ४९० क्विंटल सोयाबीनची आवक झाली.

राज्यात आज दि १५ जून रोजी सकाळच्या सत्रात ४ हजार ४९० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज पिवळ्या सोयाबीनसह पांढऱ्या हायब्रीड व लाेकल सोयाबीनची आवक हाेत आहे. मराठवाड्यातील नांदेड बाजारसमितीत आज इतर बाजारसमितींपेक्षा अधिक दर मिळत आहे.

आज अमरावती बाजारसमितीत ३६५७ लाेकल व ६१ क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. यावेळी ४२८८ ते ४३८० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळत आहे. नांदेडमध्ये १० क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. यावेळी शेतकऱ्यांना ४५५० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळत आहे.

लातूर बाजारसमितीत ७६ क्विंटल तर धाराशिव बाजारसमितीत ६५ क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. परभणीत २५२ क्विंटल सोयाबीनला ४३४५ रुपयांचा भाव मिळाला.

शेतमाल: सोयाबिन

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/06/2024
अमरावतीलोकल3657425043264288
अमरावतीपिवळा61436044004380
धाराशिव---65437543754375
धुळेहायब्रीड3425042504250
जालनापिवळा26440045004450
लातूरपांढरा76430146554475
नांदेडपिवळा10455045504550
परभणीपिवळा252416043794345
यवतमाळपिवळा340430044004350
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)4490

टॅग्स :सोयाबीनबाजारमार्केट यार्ड