वाशिम : गेल्या काही दिवसांपूर्वी ४ हजार रुपये प्रती क्विंटलपर्यंत घसरलेल्या सोयाबीनच्या दरात अचानक सुधारणा होऊ लागली आहे. कारंजा बाजार समितीत सोयाबीनचे कमाल दर गुरुवारी ४,२४५ रुपये प्रती क्विंटलपर्यंत पोहचले होते. (Soybean BajarBhav)
सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली असताना आवक मात्र कमी झाली असून, कारंजात गुरुवारी केवळ २ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. मागील वर्षभरापासून सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. (Soybean BajarBhav)
मागील वर्षी साधारणतः ४ हजार ६०० रुपये प्रती क्विंटलपर्यंत असलेले सोयाबीनचे दर मागी महिन्यापर्यंत थेट ४ हजार रुपये प्रती क्विंटलपेक्षाही खाली घसरले होते.
त्यामुळे शेतकऱ्यांत निराशेचे वातावरण पसरले होते. (Soybean BajarBhav)
तथापि, रब्बी हंगामाची तयारी आणि इतर शेतीविषयक कामांसाठी पैशांची गरज असतानाच सोयाबीनच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचा साठवणुकीपेक्षा विक्रीवरच अधिक भर होता. (Soybean BajarBhav)
मागील आठवड्यात कारंजा आणि वाशिम, या दोन मुख्य कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे कमाल दर ४ हजार रुपये प्रती क्विंटलपर्यंतच होता. या आठवड्याच्या सुरुवातीपासून मात्र, सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली. (Soybean BajarBhav)
अशातच कारंजा बाजार समितीत गुरुवारी सोयाबीनला कमाल ४ हजार २४५ रुपये प्रती क्विंटलपर्यंतचा दर मिळाला. आता दर वाढत असताना बाजारात सोयाबीनची आवक मात्र घटत आहे.
मागील शुक्रवारी १० हजार क्विंटलच्यावर आवक
जिल्ह्यातील बाजार समित्यांत मागील आठवड्यात शुक्रवारी जवळपास १० हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली होती. त्यातच वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत ३ हजार १०० क्विंटल, तर कारंजा बाजार समितीत ३ हजार क्विंटल, अशी एकूण ६ हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक दोनच बाजार समित्यांमध्ये झाली होती. गुरुवारी (२६ मार्च) मात्र, कारंजात केवळ २ हजार क्विंटल सोयाबीनचीच आवक झाली.
हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav: तुरीची आवक कोणत्या बाजारात जास्त; वाचा आजचे बाजारभाव