Join us

सोयाबीन-कापसाला किती मिळतोय दर? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 7:50 PM

सोयातेल आयात करून सोयाबीनचे तर निर्यात शुल्क आणि निर्यात मुल्यात वाढ करून कांद्याचे दर पाडले जात आहेत.

शेतकऱ्यांसाठी सध्याचे खरिपाच्या पिकाचे भाव पोषक नसल्याचं दिसून येत आहे. सोयाबीनचे उत्पादन घटूनही हमीभावाच्या आसपास दर मिळत असून केंद्राच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्याचं चित्र सध्या देशात आहे. सोयातेल आयात करून सोयाबीनचे तर निर्यात शुल्क आणि निर्यात मुल्यात वाढ करून कांद्याचे दर पाडले जात आहेत. सध्या कापसाचे उत्पादन कमी होऊनही कापसाला दर कमी असल्याचं चित्र आहे. वायदेबंदीला मुदतवाढ दिल्यामुळेही शेतकऱ्यांचे नुकसान होत असून शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे.

सोयाबीनचेही दर मागच्या काही दिवसांपासून हमीभावाच्या आसपासच स्थिर आहेत. आज लातूरच्या औसा बाजार समितीत सर्वांत जास्त म्हणजे १३ हजार ४७२ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. या समितीत ४ हजार ४०१ ते ४ हजार ८८५ रूपयांचा दर  मिळाला. आजच्या दिवसाचा विचार केला तर ४ हजार २०० ते ४ हजार ८०० रूपये प्रतिक्विंटलचा सरासरी दर मिळाला आहे.

दरम्यान, मध्यम धाग्याच्या कापसाला ६ हजार ६४० तर लांब धाग्याच्या कापसाला ७ हजार २० रूपये  प्रतिक्विंटल एवढा हमीभाव केंद्र शासनाने जाहीर केला आहे. पण अनेक शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना थेट माल विक्री करताना दिसतात. व्यापारी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कापूस खरेदी करत असल्यामुळे जास्त शेतकरीबाजार समितीत बाजार घेऊन येत नाहीत. आज वरोरा बाजार समितीत कापसाला कमीत कमी ७ हजार ते जास्तीत जास्त ७ हजार २५० रूपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे. 

आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/11/2023
सिल्लोड---क्विंटल112470048514800
वरोरापिवळाक्विंटल1250300047004300
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल678300046504300
औसापिवळाक्विंटल13472440148854792
बुलढाणापिवळाक्विंटल1000380048504200

 

आजचे कापसाचे दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/11/2023
वरोरालोकलक्विंटल201700072257100
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीकांदासोयाबीनबाजारमार्केट यार्ड