यंदा देशभरात साेयाबीनचे पेरणीक्षेत्र वाढले असले, तरी उत्पादन मात्र घटले आहे. खाद्यतेलाचा वाढलेला वापर व मागणी, तसेच तेलबियांचे घटलेले विचारात घेत, साेयाबीनला किमान सात हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळणे अपेक्षित हाेते. मात्र, खाद्यतेलाची भरमसाठ आयात करण्यात आल्याने देशांतर्गत बाजारातील तेलबियांचे दर दबावात आले असून, साेयाबीन उत्पादकांची गळचेपी केली जात आहे.
सन २०२२-२३च्या तुलनेत सन २०२३-२४ मध्ये देशात साेयाबीनचे पेरणीक्षेत्र १.१८ लाख हेक्टरने, तर महाराष्ट्रात १,५८,३०१ हेक्टरने वाढले आहे. त्यामुळे साेयाबीनच्या उत्पादनात वाढ हाेणे अपेक्षित असताना प्रतिकूल हवामान, पावसाचा दीर्घकाळ खंड, राेग व किडींचा प्रादुर्भाव, यामुळे मागील हंगामाच्या तुलनेत चालू हंगामात साेयाबीनचे उत्पादन किमान ४.९५ लाख टन कमी हाेण्याचे संकेत वायदे बाजार व साेयाबीन प्रक्रिया उद्याेजकांनी दिले.
देशात खाद्यतेलाचा सरासरी वार्षिक वापर २४० लाख लीटर असून, यातील ३५ टक्के खाद्यतेलाचे उत्पादन भारतात हाेते, तर ६५ टक्के खाद्यतेल आयात करावे लागते. उत्पादन घटल्याने व मागणी वाढल्याने साेयाबीनचे दर वधारण्याची शेतकऱ्यांना आशा असताना, शहरी ग्राहकांना कमी दरात खाद्यतेल उपलब्ध व्हावे, म्हणून साेयाबीनसह इतर तेलबियांचे दर नियंत्रित केले जातात, तसेच खाद्यतेलाची आयात वाढविण्यात आली. त्यामुळे साेयाबीनचे दर दबावात आले आहेत, असे बाजार तज्ज्ञांनी स्पष्ट केले.जागतिक बाजारातील दरसध्या जागतिक बाजारात साेयाबीनला १२ ते १३ डाॅलर प्रति बुशेल म्हणजे ४,००० रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दर मिळत आहेत. जागतिक बाजारात इतर खाद्यतेलाचे दर कमी झाले असून, निर्यात वाढत नाही. साेयाबीनच्या ढेपेला ४०० डाॅलर प्रति टन म्हणजे ३,२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.शुल्कमुक्त आयात व निर्यात सबसिडीकेंद्र सरकारने दाेन वर्षांपूर्वीच खाद्यतेलाच्या आयातीवरील शुल्क हटविला आहे, शिवाय जीएम साेयाबीनची ढेप आयातीला दाेन वर्षांपूर्वीच परवानगी दिल्याने त्यातील अडसर दूर झाला आहे. भारतातील नाॅन जीएम साेयाबीन ढेपेची निर्यात मंदावली आहे. चीन ब्राझीलमधून साेयाबीन ढेपेची कमी दरात आयात करीत असून, भारत सरकार ढेपेच्या निर्यातीला सबसिडी द्यायला व खाद्यतेलावर आयात शुल्क लावायला तयार नाही.पाच महिन्यांत ३४.६९ टक्क्यांनी आयात वाढलीमहिना - खाद्यतेल आयात (लाख टन) - वाढ (टक्के)१) जुलै २०२३ - १७.५५ - १९ टक्के२) ऑगस्ट २०२३ - १८.७५ - २३ टक्के३) सप्टेंबर २०२३ - १५.५२ - २२ टक्के४) ऑक्टाेबर २०२३ - १३.९६ - २९ टक्के५) नाेव्हेंबर २०२३ - १५.५२ - १८ टक्केसाेयाबीनला हवा किमान ३५ टक्के अधिक दरगव्हाची एमएसपी २,२७५ रुपये प्रति क्विंटल असताना, केंद्र सरकारने मध्य प्रदेशात २,७०० रुपये प्रति क्विंटल, तर धानाची एमएसपी २,१८३ रुपये असताना ३,१०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्याचे वचन दिले आहे. त्याच धर्तीवर केंद्र सरकारने साेयाबीनची खरेदी एमएसपी (४,६०० रुपये)पेक्षा ३० ते ४० टक्के अधिक दराने करावी.एल निनाे व पाम उत्पादनएल निनाेच्या प्रभावामुळे इंडाेनेशिया व मलेशियात कमी पावसाची पाम उत्पादनात घट हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पामचे उत्पादन कमी झाल्यास साेयाबीनसह इतर तेलबिया आणि खाद्यतेलाचे दर वधारण्याची शक्यता बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सप्टेंबर ते नाेव्हेंबर, २०२३ या तीन महिन्यांत भारतात पामतेलाची आयात २९ टक्क्यांनी वाढली आहे.