राज्यात आज एकूण २५ हजार ३८१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून सकाळच्या सत्रात आज लातूरमध्ये पिवळ्या सोयाबीनची सर्वाधिक आवक झाल्याचे पहायला मिळाले. १५ हजार २१५ क्विंटल पिवळे सोयाबीन आज लातूरात विक्रीसाठी दाखल झाले. यावेळी क्विंटलमागे ४५३३ रुपयांचा सर्वसाधारण भाव शेतकऱ्यांना मिळत असल्याचे पणन विभागाने नोंदवले.
राज्यात सध्या सोयाबीनची आवक होत असून शेतकऱ्यांनी साठवलेला सोयाबीन विक्रीसाठी पुन्हा काढला आहे. लातूरनंतर अमरावती, वाशिममध्ये सर्वाधिक लोकल सोयाबीनची विक्री होत असून मिळणारा सर्वसाधारण भाव ४४०० ते ४५०० रुपये प्रति क्विंटल एवढा आहे.
हिंगोली बाजारसमितीत आज पिवळ्या सोयाबीनसह लोकल सोयाबीनची आवक हाेत असून भाव ४२७२ रुपयांचा आहे. कोणत्याही बाजारसमितीत अजून हमीभाव मिळत नसल्याचे दिसून येत आहे. अजूनही साेयाबीनला हमीभाव मिळत नसून ४१०० ते ४६०० रुपयांचा भाव शेतकऱ्यांना मिळत आहे.
कोणत्या बाजारसमितीत कसा मिळतोय सोयाबीनला बाजारभाव?
जिल्हा | जात/प्रत | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|
25/05/2024 | |||||
अमरावती | लोकल | 5418 | 4350 | 4462 | 4406 |
बुलढाणा | पिवळा | 323 | 4200 | 4425 | 4313 |
हिंगोली | लोकल | 500 | 4090 | 4450 | 4272 |
हिंगोली | पिवळा | 56 | 4200 | 4300 | 4250 |
लातूर | पिवळा | 15215 | 4427 | 4681 | 4533 |
नागपूर | लोकल | 382 | 4100 | 4500 | 4400 |
परभणी | पिवळा | 27 | 4500 | 4600 | 4500 |
वाशिम | --- | 3500 | 4150 | 4535 | 4425 |
यवतमाळ | पिवळा | 280 | 4400 | 4500 | 4450 |
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) | 25701 |