Lokmat Agro >बाजारहाट > ठराविक बाजार समित्यांतच होतेय सोयाबीनची आवक अन् मिळतोय एवढा दर

ठराविक बाजार समित्यांतच होतेय सोयाबीनची आवक अन् मिळतोय एवढा दर

Soybean inflow and price are getting in certain market committees only | ठराविक बाजार समित्यांतच होतेय सोयाबीनची आवक अन् मिळतोय एवढा दर

ठराविक बाजार समित्यांतच होतेय सोयाबीनची आवक अन् मिळतोय एवढा दर

मागच्या दोन महिन्यांपासून सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळताना दिसत आहे. काही तुरळक बोटावर मोजण्याएवढ्या बाजार समित्या सोडल्या तर कुठेच हमीभावापेक्षा दर मिळत नाही.

मागच्या दोन महिन्यांपासून सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळताना दिसत आहे. काही तुरळक बोटावर मोजण्याएवढ्या बाजार समित्या सोडल्या तर कुठेच हमीभावापेक्षा दर मिळत नाही.

शेअर :

Join us
Join usNext

यंदाच्या हंगामातील पहिला एक ते दीड महिना सोडला तर सोयाबनीच्या दराने माना टाकल्या असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. तर मागच्या दोन महिन्यांपासून सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळताना दिसत आहे. काही तुरळक बोटावर मोजण्याएवढ्या बाजार समित्या सोडल्या तर कुठेच हमीभावापेक्षा दर मिळत नाही. अनेक शेतकऱ्यांनी दर मिळतील या अपेक्षेने सोयाबीन साठवून ठेवली होती पण शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. तर ठराविकच बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक होताना दिसत आहे. 

दरम्यान, आज हायब्रीड, काळा, लोकल, पिवळा या सोयाबीनची आवक झाली असून कारंजा, रिसोड, अमरावती, जालना, अकोला, हिंगणघाट या बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची आवक झाली होती. मागच्या दोन महिन्यांपासून याच बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आवक होताना दिसत आहे. तर इतर बाजार समित्यांमध्ये १०० क्विंटलपेक्षा कमी सोयाबीनची आवक होत आहे.  

आज उमरखेड आणि उमरखेड-डांकी येथे सर्वांत जास्त म्हणजे  ४ हजार ६२० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. या बाजार समित्यांमध्ये अनुक्रमे ७० आणि ३५० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर आजच्या दिवसातील सर्वांत कमी सरासरी दर हा हिंगणघाट येथे मिळाला. या बाजार समितीमध्ये ३ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून येथे २ हजार ५९८ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. 

आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/03/2024
लासलगाव---क्विंटल310380044514360
माजलगाव---क्विंटल333405044164371
सिन्नर---क्विंटल21390043854350
कळवण---क्विंटल45431243314331
पाचोरा---क्विंटल100430043204311
कारंजा---क्विंटल4000408044104380
रिसोड---क्विंटल1200415043704250
तुळजापूर---क्विंटल75440044004400
मोर्शी---क्विंटल102420043304265
राहता---क्विंटल19430043254312
धुळेहायब्रीडक्विंटल12370041004100
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल139426144754415
सोलापूरकाळाक्विंटल14448544854485
अमरावतीलोकलक्विंटल3602425043614305
नागपूरलोकलक्विंटल175410043504288
हिंगोलीलोकलक्विंटल400408044604270
कोपरगावलोकलक्विंटल61400043694300
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल9380143504300
मेहकरलोकलक्विंटल930400044204200
महागावलोकलक्विंटल520400044004200
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल171350043514335
जालनापिवळाक्विंटल1982425043754350
अकोलापिवळाक्विंटल1256400043804250
यवतमाळपिवळाक्विंटल378418043504265
मालेगावपिवळाक्विंटल22400043034290
चिखलीपिवळाक्विंटल390410043614231
हिंगणघाटपिवळाक्विंटल2598260044503600
वर्धापिवळाक्विंटल73415043754250
भोकरपिवळाक्विंटल10420042004200
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल119425043504300
जामखेडपिवळाक्विंटल19400043004150
गेवराईपिवळाक्विंटल45434043814350
चांदूर बझारपिवळाक्विंटल168400043004150
देउळगाव राजापिवळाक्विंटल2425042504250
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल45300040503700
निलंगापिवळाक्विंटल92440044984400
चाकूरपिवळाक्विंटल52438144604424
औराद शहाजानीपिवळाक्विंटल172442044604440
सेनगावपिवळाक्विंटल50400043504200
पाथरीपिवळाक्विंटल13387041514000
नेर परसोपंतपिवळाक्विंटल249410044104304
उमरखेडपिवळाक्विंटल70460046504620
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल350460046504620
चिमुरपिवळाक्विंटल55370038003750
काटोलपिवळाक्विंटल85415043904250

Web Title: Soybean inflow and price are getting in certain market committees only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.