Join us

soybean market: आज सकाळच्या सत्रात  ११ हजार १०९ क्विंटल सोयाबीनची आवक, काय मिळतोय भाव?

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 15, 2024 3:00 PM

आज बहुतांश ठिकाणी पिवळ्या सोयाबीनची आवक होत आहे.

राज्यात सोयाबीन विक्रीमध्ये मागील चार दिवसांपासून चढउतार दिसत आहे. दरम्यान, आज सकाळच्या सत्रात राज्यात वेगवेगळ्या बाजारसमितींमध्ये ११ हजार १०९ क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे.

विदर्भातून सध्या सर्वाधिक सोयाबीनची आवक होत असून मराठवाड्यातून आवक घटली आहे. आज अमरावती बाजारसमितीत ६२२९ क्विंटल लोकल सोयाबीन विक्रीसाठी आले होते. यावेळी शेतकऱ्यांना सर्वसाधारण ४६२० रुपयांचा भाव मिळाला.

आज बहुतांश ठिकाणी पिवळ्या सोयाबीनची आवक होत असून हमीभाव मिळत असल्याचे चित्र होते. धाराशिवमध्ये आज ११० क्विंटल सोयाबीनला ४६०० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळाला. तर जालना बाजारसमितीतही असाच भाव सुरु आहे.

जाणून घ्या बाजारसमितीनिहाय आवक व बाजारभाव

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/04/2024
अमरावतीलोकल6229455046904620
बुलढाणापिवळा429445045864505
धाराशिव---110460046004600
धुळेहायब्रीड4430043004300
हिंगोलीपिवळा62452545504538
जालनापिवळा23440046904600
परभणीपिवळा132445145514451
वाशिम---4000428547454320
यवतमाळपिवळा120440045004450
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)11109

 

टॅग्स :सोयाबीनबाजारमार्केट यार्ड