Join us

Soybean Market: राज्यात आज १७ हजार ४५१ क्विंटल सोयाबीनची आवक, काय मिळाला भाव?

By मुक्ता सरदेशमुख | Published: January 16, 2024 3:30 PM

१२ पैकी केवळ ४ बाजार समित्यांमधील सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिक दर.. जाणून घ्या...

आज दिनांक १६ जानेवारी २०२३ रोजी लातूर बाजारसमितीतसोयाबीनला क्विंटलमागे सरासरी ४ हजार ७५० रुपये भाव मिळाला. १० हजार ३७१ क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. तर उर्वरित बहुतांश बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्याचे चित्र होते. 

राज्यात आज साधारण १७ हजार ४५१ क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. कालच्या तूलनेत ही आवक साधारण १० हजार क्विंटलने कमी होती. आज साधारण १२ बाजार समित्यांमधून सोयाबीन विक्रीसाठी आला होता. त्यापैकी यवतमाळ, लातूर, जालना व धारशिव या केवळ ४ बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला हमीभावापेक्षा (4600 रु) अधिक दर मिळाला. दरम्यान, नागपूर बाजारसमितीत आज १ हजार ११९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. सोयाबीन ३५०० रुपये प्रतिक्विंटल भाव पिवळ्या सोयाबीनला मिळाला असून सरासरी ४२५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. हा दर हमीभावापेक्षा कमी आहे. 

जाणून घ्या कोणत्या बाजार समितीत सोयाबीनला काय भाव मिळाला..

जिल्हा

आवक

कमीत कमी दर

जास्तीत जास्त दर

सर्वसाधारण दर

अकोला

2100

4420

4600

4505

अमरावती

8829

4475

4600

4537

चंद्रपुर

70

4375

4490

4455

धाराशिव

125

4650

4650

4650

हिंगोली

124

4400

4575

4480

जळगाव

15

4100

4652

4100

जालना

8

4700

4800

4750

लातूर

120

4500

4675

4600

नागपूर

1119

3500

4550

4250

वर्धा

61

3780

4520

4190

वाशिम

4500

4425

4655

4560

यवतमाळ

380

4600

4650

4620

टॅग्स :सोयाबीनबाजारमार्केट यार्ड