Lokmat Agro >बाजारहाट > soybean Market : सोयाबीनचे विदेशात बंपर पीक; दर घटण्याचा धोका

soybean Market : सोयाबीनचे विदेशात बंपर पीक; दर घटण्याचा धोका

soybean Market : Abroad bumper crop of soybeans; Risk of falling rates | soybean Market : सोयाबीनचे विदेशात बंपर पीक; दर घटण्याचा धोका

soybean Market : सोयाबीनचे विदेशात बंपर पीक; दर घटण्याचा धोका

soybean Market : सोयाबीनला अंतराराष्ट्रीय बाजारात चांगला दर मिळेल का? वाचा सविस्तर

soybean Market : सोयाबीनला अंतराराष्ट्रीय बाजारात चांगला दर मिळेल का? वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

soybean Market : 

 विदेशात सोयाबीनचे बंपर पीक असल्याने पुढील काळात दर घसरण्याचा धोका आहे. मात्र, सोयाढेप निर्यातीसाठी सबसिडी मिळाली तर सोयाबीनचे दर वाढतील, असा अंदाज  खामगाव जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे ढेप निर्यातीवरच सोयाबीनच्या भावाचे भवितव्य ठरणार आहे.
जिल्ह्यात यावर्षी सर्वाधिक चार लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. सोयाबीनचे दर वाढतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, जून, जुलै महिना संपला तरी सोयाबीनच्या दरात कुठलीच वाढ झाली नाही. यातून शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे.
शेतकऱ्यांच्या खिशातील पैसे संपले आणि शेतमालाचे दरही घसरले. आता विदेशात सोयाबीनचे बंपर पीक असल्याने पुढील काळात दर घसरण्याचा धोका आहे. विदेशात सोयबीन सेंटचे दर गतवर्षी १६०० होते. हे दर आता ९७० सेंटपर्यंत खाली आले आहेत. यामुळे सध्या सोयाबीनच्या बाजारात घसरण झाली आहे.
पुढील काळात सोयाबीन ढेपेची निर्यात न झाल्यास दर घसरण्याचा धोका आहे यावर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीनच्या बियाण्यांचा दर वाढला आहे. त्याचप्रमाणे खताचे दर, मजुरीचे दर व फवारणी औषधांच्या किमतीही वाढलेल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतमालाचे दर मात्र घसरले आहेत

असे घसरले सोयबीनचे दर
दिनांक                      भाव

१ जुलै                        ४४००
१० जुलै                      ४३५०
१५ जुलै                      ४३२५
२० जुलै                      ४२५०
२५ जुलै                      ४२००
१ ऑगस्ट                    ४१५०                    
१६ ऑगस्ट                  ४१०० 

सोयाबीनचे दर घसरण्याची कारणे
* जागतिक बाजारात सोयाबीनचे उत्पादन अधिक होण्याचा अंदाज आहे.
* तेलावर आयात शुल्क कमी केले.
* ढेपेची निर्यात थांबलेली आहे.
* येत्या काळात सोयाबीनच्या दरात घसरण होऊ शकते.


शेतकरी म्हणतात
राज्य शासनाने लाडक्या बहिणीप्रमाणे शेतकऱ्याच्या संरक्षणासाठी त्याच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. मात्र, शेतमालाच्या बाबतीत सरकार उदासीन आहे. यातून शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस खस्ता होत आहे. शेतकऱ्यांना खर्चावर आधारित दर मिळावे.
- अमोल वानखडे,शेतकरी.

काय म्हणतात व्यापारी
केंद्र शासनाच्या निर्णयावरच सोयाबीनचे दर ठरणार आहेत. सोयाढेपेच्या निर्यातीला अनुदान मिळाले तरच सोयाबीनचे दर वाढतील. अन्यथा तेल आयातीचा त्याला फटका बसेल. सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात घटतील.
- गौरव चौधरी, व्यापारी.
 

 

Web Title: soybean Market : Abroad bumper crop of soybeans; Risk of falling rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.