Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Market : सोयाबीनच्या दर घसरणीचा शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना फटका; लाखो क्विंटल सोयाबीन वेअर हाऊस, घरामध्ये पडून

Soybean Market : सोयाबीनच्या दर घसरणीचा शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना फटका; लाखो क्विंटल सोयाबीन वेअर हाऊस, घरामध्ये पडून

Soybean Market: Farmers and traders are affected by the fall in the price of soybeans; Millions of quintals of soybeans lying in the warehouse, indoors | Soybean Market : सोयाबीनच्या दर घसरणीचा शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना फटका; लाखो क्विंटल सोयाबीन वेअर हाऊस, घरामध्ये पडून

Soybean Market : सोयाबीनच्या दर घसरणीचा शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना फटका; लाखो क्विंटल सोयाबीन वेअर हाऊस, घरामध्ये पडून

शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेल्या सोयाबीनच्या दरात मागील दोन वर्षांपासून वाढ झालेली नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांसह वेअर हाऊसमध्ये लाखो क्विंटल साठा करून ठेवलेल्या व्यापाऱ्यांना बसत आहे. भाव वाढतील या अपेक्षेने सोयाबीन खरेदी करून साठवून ठेवलेल्या व्यापाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा तोटा यावर्षी सहन करावा लागतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेल्या सोयाबीनच्या दरात मागील दोन वर्षांपासून वाढ झालेली नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांसह वेअर हाऊसमध्ये लाखो क्विंटल साठा करून ठेवलेल्या व्यापाऱ्यांना बसत आहे. भाव वाढतील या अपेक्षेने सोयाबीन खरेदी करून साठवून ठेवलेल्या व्यापाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा तोटा यावर्षी सहन करावा लागतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

विनायक चाकुरे

लातूर जिल्ह्यातील उदगीर परिसरातील शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेल्या सोयाबीनच्या दरात मागील दोन वर्षांपासून वाढ झालेली नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांसह वेअर हाऊसमध्ये लाखो क्विंटल साठा करून ठेवलेल्या व्यापाऱ्यांना बसत आहे. भाव वाढतील या अपेक्षेने सोयाबीन खरेदी करून साठवून ठेवलेल्या व्यापाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा तोटा यावर्षी सहन करावा लागतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

तीन वर्षांपूर्वी सोयाबीनला विक्रमी १० हजार रुपये क्विंटलचा विक्रमी भाव मिळाला होता. तेव्हापासून या भागातील शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. त्यामुळे सोयाबीनचे पेरणीचे क्षेत्र दरवर्षी वाढत आहे. त्याच्या दुसऱ्या वर्षीपासून शेतकऱ्यांनी माल विक्री करण्यापेक्षा साठवणुकीवर भर दिला.

त्यासोबतच हंगामात व्यापाऱ्यांनीही सोयाबीन खरेदी करून वेअर हाऊसमध्ये साठवून ठेवला आहे. अनेक व्यापाऱ्याकडे हजारो पोती सोयाबीन साठा करून ठेवलेले आहे. शहराच्या आसपास असलेल्या वेअर हाऊसमध्ये व्यापाऱ्यांचे लाखो क्विंटल सोयाबीन भाव वाढतील, या आशेने दोन वर्षांपासून विक्रीविना साठा करून ठेवले आहे. मात्र, चांगला दर नसल्याने सोयाबीन विक्रीविना पडून आहे. दर कधी वाढतील याची प्रतीक्षा आहे.

बाजारात आवक झाली कमी...

• सर्वसाधारणपणे शेतमाल संपल्यानंतर दरामध्ये वाढ होते. हा समज आहे; परंतु यावर्षीचा हंगाम संपला असून पुढील दीड ते दोन महिन्यांत नवीन सोयाबीन बाजारात येण्याची शक्यता शेतकरी वर्तवीत आहेत.

• हंगामात ५ हजार रुपये क्विंटलपेक्षा ७०० रुपये कमीने म्हणजेच ४ हजार ३०० प्रतिक्विंटलने सोयाबीनची विक्री होत आहे. त्यामुळे हंगामात खरेदी केलेल्या दरापेक्षा कमी भाव मिळत असल्याने व्यापाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. ४ ते ५ हजार पोत्यांची आवक आहे.

बाजारात सोयाबीनचा दर्जा घसरला...

• हंगामात खरेदी करून साठवून ठेवलेला माल व शेतकऱ्यांनी मागील दोन वर्षांपासून विक्री न करता घरी ठेवलेला माल या दोन्ही मालाचा दर्जा घसरला आहे.

• दोन वर्षापासून वेअर हाऊस किंवा घरी असलेला सोयाबीन लाल पडत आहे. लाल पडलेल्या सोयाबीनमधील तेल व सोयापेंड खराब होते म्हणून कारखानदार कमी दराने खरेदी करतात. त्याचा फटका शेतकरी, साठा करून ठेवलेल्या व्यापाऱ्यांना बसत आहे.

नवीन सोयाबीनला जागा नाही...

• पुढील दीड ते दोन महिन्यांमध्ये नवीन सोयाबीन बाजारात येईल. मागील दोन वर्षांपासूनचा माल वेअर हाऊसमध्ये पडून आहे. तेव्हा खरेदी केलेला कुठे ठेवावा, असा प्रश्न व्यापाऱ्यांपुढे पडला आहे.

• मागील काही दिवसांपूर्वी १२ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत गेलेली तूर आता ११ हजारांपर्यंत खाली आली असून, हरभरा देखील ७ हजारांवरून ६ हजार ६०० प्रतिक्विंटल दराने विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

तूट, वेअर हाऊस भाडे अंगावर...

• हंगामात व्यापारी १० टक्क्यांपर्यंत ओलावा असलेला माल खरेदी करून ठेवला होता. दोन वर्षांपासून माल पडून असल्याने सध्या ७ टक्क्यांपर्यंत ओलावा येत आहे. म्हणजेच क्चिटलमागे ३ किलोंची तूट येत आहे.

• १०० पोत्यांच्या मागे ३ क्विंटल सोयाबीन वजनात कमी येत असून, वेअर हाऊसचे हजारो रुपयांचे भाडे भरूनसुद्धा मुद्दलमधून १०० क्विंटलमागे किमान १ लाख ३० हजारांचे नुकसान होत आहे.

 कृषी पणन मंडळाच्या अधिकृत महितीनुसार राज्यातील दि. ०३ ऑगस्ट रोजीची सोयाबीन आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/08/2024
लासलगाव - विंचूर---क्विंटल267300043484300
बार्शी---क्विंटल75427543254300
माजलगाव---क्विंटल326390043004275
राहूरी -वांबोरी---क्विंटल22418142004185
कारंजा---क्विंटल700414042904195
तुळजापूर---नग50430043004300
मालेगाव (वाशिम)---क्विंटल120400042804200
राहता---क्विंटल7420042314221
अमरावतीलोकलक्विंटल861415042514201
नागपूरलोकलक्विंटल3400042004150
हिंगोलीलोकलक्विंटल205400044004200
कोपरगावलोकलक्विंटल66400042704230
मेहकरलोकलक्विंटल460400042804200
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल87399942904261
वडूजपांढराक्विंटल10462046604640
पातूरपांढराक्विंटल53380042004039
लातूरपिवळाक्विंटल11460405043704330
जालनापिवळाक्विंटल1272400042704250
अकोलापिवळाक्विंटल1397400042804220
मालेगावपिवळाक्विंटल25403641184108
आर्वीपिवळाक्विंटल31350042004090
चिखलीपिवळाक्विंटल85400042004100
वाशीमपिवळाक्विंटल1800412042704200
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल300402043004200
उमरेडपिवळाक्विंटल170400042104100
भोकरदनपिवळाक्विंटल5420044004300
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल90412042804200
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल380395042454100
मलकापूरपिवळाक्विंटल430380042754200
जामखेडपिवळाक्विंटल18400042004100
गेवराईपिवळाक्विंटल19405040504050
देउळगाव राजापिवळाक्विंटल3420042004200
गंगापूरपिवळाक्विंटल3410041004100
आंबेजोबाईपिवळाक्विंटल70410043154275
केजपिवळाक्विंटल24350043004250
औराद शहाजानीपिवळाक्विंटल148428543504317
उमरगापिवळाक्विंटल2415141904170
पाथरीपिवळाक्विंटल3420042004200
चांदूर-रल्वे.पिवळाक्विंटल10420042004200
नेर परसोपंतपिवळाक्विंटल182315042854097
बाभुळगावपिवळाक्विंटल277400043154250
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल7380039503900

Web Title: Soybean Market: Farmers and traders are affected by the fall in the price of soybeans; Millions of quintals of soybeans lying in the warehouse, indoors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.