राज्यात सोयाबीनच्या पडत्या दराबाबत शेतकरी नाराज असताना अजूनही सोयाबीनच्या दरात सुधारणा होत नसल्याचे पणन विभागाच्या माहितीवरून स्पष्ट होते. सद्य:स्थितीत सोयाबीनचा सरासरी दर साडेचार हजारांच्याही खाली आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध पवित्रा घेतला असून, ते सोयाबीनची गरजेनुसार विक्री करीत आहेत..
आज दि ६ मे रोजी सकाळच्या सत्रात केवळ २१८ क्विंटल सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आले होते. दरम्यान, आज केवळ हिंगोली बाजारसमितीत हमीभावापेक्षा अधिक भाव मिळाला आहे. उर्वरित बाजार समित्यांमध्ये दर अजूनही ४३०० ते ४५०० रुपयांदरम्यानच आहेत.
पहा आजचे बाजारभाव
जिल्हा | जात/प्रत | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|
06/05/2024 | |||||
बुलढाणा | पिवळा | 6 | 4000 | 4500 | 4300 |
धाराशिव | --- | 40 | 4525 | 4525 | 4525 |
धाराशिव | पिवळा | 4 | 4200 | 4500 | 4200 |
हिंगोली | पिवळा | 40 | 5000 | 5000 | 5000 |
जालना | पिवळा | 8 | 4010 | 4560 | 4500 |
यवतमाळ | पिवळा | 120 | 4400 | 4500 | 4450 |
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) | 218 |