Join us

Soybean Market: राज्यात १० हजार ८७५ क्विंटल सोयाबीनची आवक, या बाजारसमितींमध्ये असा मिळतोय बाजारभाव

By मुक्ता सरदेशमुख | Published: May 29, 2024 2:53 PM

पणन विभागाच्या माहितीनुसार, आज सोयाबीनला असा भाव मिळतोय..

राज्यात मागील महिन्याभरापासून सोयाबीनची आवक काही प्रमाणात वाढली असून आज दुपारी २.४० पर्यंत १० हजार ८७५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यावेळी क्विंटलमागे ४२०० ते ४५०० रुपयांचा भाव मिळत आहे.

अमरावती बाजारसमितीत आज सर्वाधिक सोयाबीनची आवक झाली. आज ६३१२ क्विंटल लोकल सोयाबीन विक्रीसाठी दाखल झाले होते. ही बाजारसमिती वगळता इतर बाजारसमितींमध्ये पिवळ्या सोयाबीनची आवक झाली.

हिंगालीमध्ये आज ६५ क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक होत असून सर्वसाधारण ४२५० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळत आहे. जालना बाजारसमितीत १० क्विंटल पिवळ्या सोयाबीनला ४५२२ रुपयांचा दर मिळत आहे.

उर्वरित बाजारसमितीत काय मिळताेय भाव?

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/05/2024
अमरावतीलोकल6312435044434396
बीडपिवळा91447544814477
बुलढाणापिवळा100415043504250
चंद्रपुरपिवळा41651343004275
हिंगोलीपिवळा65415043504250
जालनापिवळा10452045384522
परभणीपिवळा132455146014551
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)10875

टॅग्स :सोयाबीनबाजारमार्केट यार्ड