Join us

Soybean Market: सकाळच्या सत्रात राज्यात २९८५ क्विंटल सोयाबीनची आवक, हमीभाव मिळतोय का?

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 22, 2024 2:01 PM

सोयाबीनची आवक मंदावली. आज सकाळच्या सत्रात केवळ ४ बाजारसमितींमधून आवक

राज्यात मागील महिन्याभरापासून सोयाबीनचे दर स्थिर असून शेतकऱ्यांना हमीभावही मिळत नसल्याचे चित्र आहे. भाववाढ होईल या आशेने अनेक शेतकऱ्यांवर सोयाबीनची साठवणूक करण्याची वेळ आली आहे.दरम्यान, आज राज्यात सकाळच्या सत्रात एकूण २९८५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली.

पिवळा व लोकल जातीच्या सोयाबीनला आज साधारण ४३०० ते ४४०० रुपयांचा  दर मिळाला. आज अमरावती बाजारसमितीत २८४५ क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. क्विंटलमागे मिळालेला दर हा कमीतकमी ४४०० रुपये एवढा होता. तर सर्वसाधारण ४४२५ एवढा भाव सोयाबीनला आज मिळाला. 

धाराशिव जिल्हा बाजारसमितीत आज ६५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून सर्वसाधारण ४४०० रुपये क्विंटलमागे दर मिळाला. मागील चार दिवसांपासून धाराशिवमध्ये सोयाबीनच्या भावात फारसा बदल झालेला नाही.

पणन विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, बुलढाण्यात आज ४ क्विंटल पिवळ्या सोयाबीनला ४४०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तर हिंगोलीत  ११० क्विंटल पिवळ्या सोयाबीनला ४३६५ रुपये भाव मिळाला.

टॅग्स :सोयाबीनबाजारमार्केट यार्ड