हिंगोली जिल्ह्यात पेरण्या नुकत्याच अटोपल्या, बियाणे पेरून शिल्लक राहिलेले सोयाबीन आता शेतकरीबाजारात विक्रीसाठी आणू लागले आहेत. त्यामुळे जूनच्या तुलनेत आठवड्यापासून आवक किंचित वाढली आहे; परंतु, दरकोंडी मात्र धान्य कायम असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे.
गतवर्षीच्या खरिपात पावसाचा लहरीपणा आणि सोयाबीन ऐन भरात असताना येलो मोझेंकचा प्रादुर्भाव झाला. परिणामी, उत्पादन जवळपास हळद निम्म्याने घटले. अशा परिस्थितीत किमान सहा हजाराचा भाव मिळेल अशी अपेक्षा असताना सोयाबीनने पाच हजाराचा पल्लाही गाठला नाही.
या भावात सोयाबीनची विक्री करणे परवडत नसल्याने अनेकांनी आज-उद्या भाव वाढतील, या आशेवर सोयाबीन विक्रीविना ठेवले. परंतु, भाववाढीची प्रतीक्षा करण्यात जवळपास सात महिन्यांचा कालावधी उलटला तरी दरकोंडी कायम आहे.
खरीप हंगामाची पेरणी आटोपली असून, तीन ते साडेतीन महिन्यात नवे सोयाबीन उपलब्ध होणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे बियाणे पेरून सोयाबीन शिल्लक आहे, ते आता विक्रीसाठी आणत आहेत. परंतु, भाव साडेचार हजाराच्या खालीच मिळत आहे. भाववाढीच्या आशेवर एवढे दिवस सोयाबीन विक्रीविना घरात ठेवून फायदा झाला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
बाजारभाव काय?
धान्य | आवक (क्विं. मध्ये) | सरासरी भाव |
तूर | १०० | ११,३५० |
भुईमूग | ८०० | ६,३०२ |
सोयाबीन | ३५० | ४,२७५ |
हरभरा | १०५ | ६,२३५ |
हळद | १५०० | १४,००० |
पडत्या भावामुळे शेतकऱ्यांची निराशा
सोयाबीनची दरकोंडी कायम असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली. आता येणाऱ्या नवीन सोयाबीनला तरी समाधानकारक भाव मिळावा, अशी अपेक्षा आहे.
गव्हाचे भाव वाढले
■ गतवर्षीच्या रब्बी हंगामात गव्हापेक्षा हरभऱ्याचा पेरा अधिक होता. त्यामुळे गव्हाचे उत्पादन कमी झाले.
■ परिणामी, यंदा मोंढ्यात गव्हाची आवक कमीच राहिली. त्यामुळे नागरिकांना चढ्या भावातच गहू विकत घ्यावा लागला. सध्याही भाव वधारलेले आहेत.
शेतकरी काय म्हणतात?
अलिकडच्या काळात प्रमुख आणि नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहतो. परंतु, यंदा सोयाबीन पडत्या भावात विकावे लागले. परिणामी, लागवड खर्चही वसूल झाला नाही. - रामेश्वर कव्हळे, शेतकरी.
पावसाचा लहरीपणा, किडीचा प्रादुर्भाव यामुळे पीक घरात येईपर्यंत काहीच स्वरं नाही. सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यातच कवडीमोल भावात विकावे लागले. - पिराजी घुगे, शेतकरी.