Join us

Soybean Market: लातूरच्या पिवळ्या सोयाबीनला मिळतोय सध्या एवढा भाव, उर्वरित ठिकाणी काय स्थिती?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 5:44 PM

आज केवळ एकाच बाजारसमितीत सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिक भाव मिळत असून उर्वरित बाजारसमितीत...

राज्यात सध्या सोयाबीनची आवक होत असून शेतकऱ्यांनी साठवलेला सोयाबीन विक्रीसाठी पुन्हा काढला आहे. आज राज्यात ३९ हजार ३५ क्विंटल साेयाबीनची आवक झाली. केवळ सातारा बाजारसमितीत सोयाबीनला आज आधारभूत किंमत मिळाली. तर लातूरच्या पिवळ्या सोयाबीनला शेतकऱ्यांना ४५४० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळाला.

अजूनही साेयाबीनला हमीभाव मिळत नसून ४३०० ते ४४०० रुपयांचा भाव शेतकऱ्यांना मिळत आहे.

दरम्यान, धाराशिवमध्ये ६० क्विंटल साेयाबीनला मिळणारा भाव ४५०० रुपयांचा होता. हिंगोलीत पिवळ्या सोयाबीनला ४२९५ रुपये तर जालन्यात ४२०० रुपयांचा भाव मिळत आहे. साताऱ्यात पांढऱ्या साेयाबीनला ४६३० रुपयांचा बाजारभाव मिळत असून आज केवळ एकाच बाजारसमितीत सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिक भाव मिळत असून उर्वरित बाजारसमितीत ४५०० रुपयांचा भाव मिळत आहे.

कोणत्या बाजारसमितीत कसा मिळतोय सोयाबीनला बाजारभाव?

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/05/2024
अहमदनगरपिवळा16400044004200
अकोलापिवळा8480413045184398
अमरावतीलोकल3883432544114368
अमरावतीपिवळा900360044704350
बीडपिवळा282439145014440
बुलढाणालोकल690400045004300
बुलढाणापिवळा1868405644454310
चंद्रपुरपिवळा124415042004175
धाराशिव---60450045004500
धुळेहायब्रीड3410541054105
हिंगोलीलोकल900409045004295
हिंगोलीपिवळा88422043604290
जालनालोकल25395043854200
जालनापिवळा27440045504500
लातूर---2750450045804540
लातूरपिवळा10544425046334522
नागपूरलोकल178420044054354
नागपूरपिवळा2086405043504200
नांदेडपिवळा68420044504300
परभणीपिवळा37437544604437
सातारापांढरा10461046504630
सोलापूरलोकल30449546104550
वर्धापिवळा3090341344854025
वाशिम---2500415045254400
यवतमाळपिवळा396370044934350
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)39035

टॅग्स :सोयाबीनबाजारमार्केट यार्ड