Join us

Soybean Market: मतमोजणीदिवशी ही बाजारसमिती वगळता सोयाबीला क्विंटलमागे हमीभावाहून कमीच!

By मुक्ता सरदेशमुख | Published: June 04, 2024 4:34 PM

लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीदिवशी कोणत्या बाजारसमितीत सोयाबीनला असा मिळतोय भाव..

राज्यात मतमोजणीदिवशी परभणी बाजारसमिती वगळता सोयाबीनला क्विंटलमागे हमीभावाहून कमीच बाजारभाव मिळत आहे. राज्यात आज दुपारी ४.३० वाजेपर्यंत ८ हजार ३०३ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज राज्यात लोकल व पिवळ्या सोयाबीनची आवक झाली असून क्विंटलमागे ४३०० ते ४५०० रुपयांचा भाव मिळत आहे. परभणीत सोयाबीनला ४६०१ रुपयांचा भाव मिळाला.

राज्यात सोयाबीनला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी साठवणूकीला पसंती दिली. आता खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांनी सोयाबीन पुन्हा विक्रीसाठी काढले असले तरी बाजारभावात फारसा फरक पडल्याचे दिसत नसल्याचे पणन विभागाच्या माहितीवरून दिसून येत आहे.

कोणत्या बाजारसमितीत साेयाबीनला काय भाव मिळाला?

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/06/2024
अमरावतीलोकल2820430043754337
बीडपिवळा5430043514325
चंद्रपुरपिवळा71390042604245
छत्रपती संभाजीनगर---33430043504325
छत्रपती संभाजीनगरपिवळा1440044004400
धाराशिव---60445044504450
धाराशिवपिवळा1445044504450
हिंगोलीपिवळा67423043304280
जालनापिवळा19445045114480
नागपूरपिवळा41370044254300
नांदेडपिवळा14415143114231
नाशिकपिवळा12425044444444
परभणीपिवळा40460146014601
वर्धापिवळा2544290045253800
वाशिम---2500414544654390
यवतमाळपिवळा75425043204295
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)8303

टॅग्स :सोयाबीनबाजारमार्केट यार्ड