Join us

Soybean Market Maharashtra: सकाळच्या सत्रात ६५५४ क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक, असा मिळतोय भाव

By मुक्ता सरदेशमुख | Published: June 13, 2024 2:20 PM

पणन विभागाची माहिती

आज दि १३जून रोजी राज्यात सकाळच्या सत्रात ६ हजार ५५४ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यावेळी अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक आवक होत आहे. या बाजारसमितीत ५५८९ क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. यवतमाळमध्ये आज २२० क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. क्विंटलमागे ४३५० रुपयांचा भाव मिळत आहे.

हिंगोलीमध्येही आज पिवळ्या सोयाबीनसह लोकल सोयाबीनचीही आवक झाली. आज दोन्ही मिळून २६३ क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे. क्विंटलमागे ४२९५ ते ४४५० रुपयांचा भाव मिळत आहे.

शेतमाल: सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/06/2024
अमरावतीलोकल5589420042654232
बुलढाणापिवळा15400042504125
हिंगोलीलोकल200405044004225
हिंगोलीपिवळा63424043504295
जालनापिवळा3430044384400
परभणीपिवळा64358043284258
वाशिमपिवळा400425044504350
यवतमाळपिवळा220430044004350
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)6554
टॅग्स :सोयाबीनबाजार