Join us

Soybean Market Maharashtra: सकाळच्या सत्रात सोयाबीनची आवक कशी होतेय? क्विंटलमागे मिळतोय…

By मुक्ता सरदेशमुख | Published: June 05, 2024 2:24 PM

आज दि ५ जून रोजी राज्यात सकाळच्या सत्रात ७ हजार ७४८ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यावेळी अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक ...

आज दि ५ जून रोजी राज्यात सकाळच्या सत्रात ७ हजार ७४८ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यावेळी अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक आवक होत आहे. या बाजारसमितीत ५६४३ क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली.

हिंगोलीमध्येही ११०० क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे. क्विंटलमागे ४२८५ ते ४३५१ रुपयांचा भाव मिळत आहे. धाराशिवमध्ये आज सकाळच्या सत्रात ६० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यावेळी शेतकऱ्यांना ४४२५ रुपयांचा भाव मिळाला.

बुलढाण्यात आज सकाळच्या सत्रात ५३० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यावेळी ४३८० रुपयांचा भाव मिळाला. तर यवतमाळमध्ये १८० क्विंटल सोयाबीनला ४३५० रुपयांचा भाव शेतकऱ्यांना मिळाला.

टॅग्स :सोयाबीनबाजार