Join us

Soybean Market: सोयाबीनची आवक वाढली; बाजारभाव वाढेल का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 2:14 PM

सातारा : जिल्ह्यात वेळेत पाऊस सुरू झाल्याने पेरणी पूर्णत्त्वाकडे आहे. त्यातच यंदा सोयाबीनचा पेरा अधिक होण्याने उत्पादनही वाढणार आहे. ...

सातारा : जिल्ह्यात वेळेत पाऊस सुरू झाल्याने पेरणी पूर्णत्त्वाकडे आहे. त्यातच यंदा सोयाबीनचा पेरा अधिक होण्याने उत्पादनही वाढणार आहे. त्यामुळे बाजारात जुन्या सोयाबीनची आवक वाढली आहे. साताराबाजार समितीत क्विंटलला ४ हजार ६५० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. तरीही हमीभावापेक्षा हा दर २५० रुपयांनी कमी आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वांत मोठा असतो. सुमारे तीन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होते. सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक राहते. त्यातच गेल्या काही वर्षांपासून सोयाबीनच्या क्षेत्रात सतत वाढ होत चालली आहे. दरात उतार आला तरी क्षेत्र कमी झालेले नाही.

यावर्षीही ९० हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पेरणीची टक्केवारी १२५ पर्यंत जाऊ शकते. मागील तीन वर्षांपूर्वी सोयाबीनला क्विंटलला ११ हजारांपर्यंत दर मिळाला होता.

यंदा १४ पिकांच्या हमीभावात वाढ- जून महिन्यात केंद्रात नवीन सरकार स्थापन झाले. या सरकारच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत १४ पिकांच्या हमीभावात वाढ करण्यात आली.- सोयाबीनचा पूर्वी हमीभाव क्विंटलला ४ हजार ६०० रुपये होता. आता २९२ रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे नवीन हमीभाव ४ हजार ८९२ रुपये झाला आहे.- हायब्रीड ज्वारी ३ हजार ३७१, मालदांडी ज्वारी ३ हजार ४२१, बाजरीचा २ हजार ६२५, मक्याचा २ हजार २२५ रुपये हमीभाव झाला आहे.

सातारा बाजार समितीतील धान्य बाजारभाव (क्विंटलमध्ये) (₹)धान्य दर (प्रतिक्विंटल)ज्वारी (शाळू) ४,०००-५,५००ज्वारी संकरित १,८००-२,०००गहू (२१८९) २,५००-२,८००गहू लोकवन २,७००-३,०००तांदूळ इंद्रायणी ३,५००-४,५००तांदूळ कोलम ३,५००-४,५००तांदूळ आंबेमोहर ६,८००-७,०००तांदूळ बासमती २,८००-८,०००घेवडा वाघा नवीन ७,०००-८,०००घेवडा काळा नवीन ७,०००-७,२००घेवडा वरुण नवीन ७,०००-७,५००उडीद ७,५००-८,०००मूग ८,०००-१०,०००तूर ६,०००-७,०००सोयाबीन ४,६००-४,६५०

यावर्षी पाऊस वेळेत पडला. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणी वेगात सुरू आहे. यंदाही सोयाबीनची पेरणी अधिक होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरासाठी घरात ठेवलेले जुने सोयाबीन विक्रीसाठी बाजारात येत आहे. तरीही केंद्र शासन सोयाबीन तेल आणि पेंड आयात करत असल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असे वाटत नाही. त्यातच सोयाबीनचा हमीभाव वाढून ४ हजार ९०० रुपये झाला आहे. तरीही बाजारात सोयाबीनला क्विंटलला साडे चार हजारांपर्यंत दर येत आहे. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :सोयाबीनबाजारमार्केट यार्डसातारापुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरीपीक