Join us

सोयाबीनला आज कुठल्या बाजारसमितीत जास्त भाव मिळाला? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 2:29 PM

आज दिनांक ८ फेब्रुवारी रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये सकाळच्या सत्रातील व्यवहारांत सोयाबीनला कसा बाजारभाव मिळाला, ते जाणून घेऊ यात.

आज दिनांक ८ फेब्रुवारी रोजी हिंगोली-खानेगाव नाका बाजारसमितीत पिवळ्या सोयाबीनची १०९ क्विंटल आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी सोयाबीनबाजारभाव ४२०० रुपये प्रति क्विंटल मिळाला, तर सरासरी ४२९५ असा होता.

आज सकाळच्या सत्रात नागपूर बाजारसमितीत सोयाबीनची १०३८ क्विंटल इतकी आवक झाली असून कमीत कमी बाजारभाव ४२०० रुपये, तर सरासरी बाजारभाव ४५२३ रुपये प्रति क्विंटल असे होते. 

अंबड वडीगोद्री येथील बाजारसमितीत आज सर्वात कमी म्हणजेच ३७७६ रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर मिळाले. विशेष म्हणजे या ठिकाणी सोयाबीनची केवळ १६ क्विंटल इतकीच आवक झाली. या बाजारसमितीत सरासरी ३९५१ रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला दर मिळाला.

मागील काही दिवसांपासून सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी दर मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार आज सकाळच्या सत्रात राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनला पुढीलप्रमाणे बाजारभाव मिळाले.

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

बार्शी---क्विंटल232445044504450

छत्रपती

संभाजीनगर

---क्विंटल14420042604230
धुळेहायब्रीडक्विंटल7433543354335
नागपूरलोकलक्विंटल1038420046304523
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल16377644003951
जळकोटपांढराक्विंटल179447547254630
बीडपिवळाक्विंटल102445046004547

हिंगोली-

खानेगाव नाका

पिवळाक्विंटल109424043704295
परतूरपिवळाक्विंटल6440045004450
गंगाखेडपिवळाक्विंटल19450046004500

देउळगाव

राजा

पिवळाक्विंटल32440044004400
पाथरीपिवळाक्विंटल8420044004351
टॅग्स :सोयाबीनबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीलातूर