Lokmat Agro >बाजारहाट > आज सोयाबीन दराची स्थिती काय? जाणून घ्या बाजारभाव

आज सोयाबीन दराची स्थिती काय? जाणून घ्या बाजारभाव

soybean market rate market yard maharashtra agriculture farmer diwali festival | आज सोयाबीन दराची स्थिती काय? जाणून घ्या बाजारभाव

आज सोयाबीन दराची स्थिती काय? जाणून घ्या बाजारभाव

सोयाबीनच्या उत्पादनामध्ये मोठी घट झाली असल्याने दर चढे असतील अशी आशा होती पण हमीभावापेक्षा जास्त दर मिळत नसल्याचं चित्र सध्या बाजारात आहे. 

सोयाबीनच्या उत्पादनामध्ये मोठी घट झाली असल्याने दर चढे असतील अशी आशा होती पण हमीभावापेक्षा जास्त दर मिळत नसल्याचं चित्र सध्या बाजारात आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

दसऱ्याच्या सणानंतर सोयाबीनला हमीभावाच्या आसपास दर मिळताना दिसत आहे. यावर्षी पहिल्या सत्रात अतिवृष्टी आणि दुसऱ्या टप्प्यात पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे सोयाबीन आणि अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनामध्ये मोठी घट झाली असल्याने दर चढे असतील अशी आशा होती पण हमीभावापेक्षा जास्त दर मिळत नसल्याचं चित्र सध्या बाजारात आहे. 

दरम्यान, कांद्यासहित सोयाबीनच्याही दरावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारकडून नेहमी हस्तक्षेप केला जातो. सोयातेल आयात करून सोाबीनचे दर पाडण्याची सरकारची खेळी यशस्वी झाली आहे. त्याचबरोबर वायदेबंदीला मुदतवाढ दिल्यामुळे शेतकऱ्यांना आगामी बाजाराचा अंदाज येत नसल्यामुळे मोठ्या फायद्यापासून लांब रहावे लागत आहे. या कारणांमुळे शेतकऱ्यांना हवा तसा दर मिळत नाही.

आजच्या सोयाबीनच्या दराचा विचार केला तर आज बाजारात दर स्थिर होते. आज लातूर बाजार समितीत सर्वांत जास्त १६ हजार ६५८ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या बाजार समितीत ४ हजार ६०० ते ४ हजार ७९२ रूपयांच्या दरम्यान दर मिळाला. आज शेगाव-वरोरा बाजार समितीत ३००० रूपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला तर मेहकर बाजार समितीत ५ हजार १५५ रूपये प्रतिक्विंटलचा कमाल दर मिळाला आहे. दिवाळीच्या तोंडावर दर वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांना आहे.

जाणून घेऊया सोयाबीनचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
02/11/2023
अहमदनगर---क्विंटल1152440047704585
जळगाव---क्विंटल214430047454700
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल80370046904195
राहूरी -वांबोरी---क्विंटल23420146574625
कारंजा---क्विंटल12000437548304705
अचलपूर---क्विंटल13000435048364593
तुळजापूर---क्विंटल1820450046254600
मोर्शी---क्विंटल1800450047504625
राहता---क्विंटल51420048664700
सोलापूरलोकलक्विंटल916375047304605
अमरावतीलोकलक्विंटल15873455047614655
नागपूरलोकलक्विंटल4436420048224667
हिंगोलीलोकलक्विंटल1990449949504724
मेहकरलोकलक्विंटल2700450051554800
परांडानं. १क्विंटल17460047004640
लातूरपिवळाक्विंटल16658460047924710
अकोलापिवळाक्विंटल12349400048204600
मालेगावपिवळाक्विंटल31452548034751
चिखलीपिवळाक्विंटल2850430051194709
अक्कलकोटपिवळाक्विंटल321460047414700
वाशीमपिवळाक्विंटल4500450048504650
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल2400465050004850
कळमनूरीपिवळाक्विंटल50450045004500
उमरेडपिवळाक्विंटल6545350050254700
चाळीसगावपिवळाक्विंटल18450047114651
भोकरपिवळाक्विंटल376385146334242
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल658450047004600
जिंतूरपिवळाक्विंटल527460049504740
दिग्रसपिवळाक्विंटल815435048554685
वणीपिवळाक्विंटल458401547954400
जामखेडपिवळाक्विंटल596420046504425
देउळगाव राजापिवळाक्विंटल270400047504550
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल303300046404100
साक्रीपिवळाक्विंटल30400148014400
तळोदापिवळाक्विंटल74420249714900
धरणगावपिवळाक्विंटल28442548804790
तासगावपिवळाक्विंटल25485051004990
औसापिवळाक्विंटल8235420048684761
मुरुमपिवळाक्विंटल3313430147314516
उमरगापिवळाक्विंटल402455047104680
पुर्णापिवळाक्विंटल694439048154791
पाथरीपिवळाक्विंटल180390046754550
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल470460048504700
घाटंजीपिवळाक्विंटल650420047754550
उमरखेडपिवळाक्विंटल510460047004650
चिमुरपिवळाक्विंटल50380040003900
राजूरापिवळाक्विंटल572422546604570
भद्रावतीपिवळाक्विंटल94420046004400
काटोलपिवळाक्विंटल825405049004550
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल5000400048004650
कोर्पनापिवळाक्विंटल95420046004350
देवणीपिवळाक्विंटल278460048154707

Web Title: soybean market rate market yard maharashtra agriculture farmer diwali festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.