Join us

Soybean Market Rate : दिवाळीच्या दिवशी देखील सोयाबीनला बाजारात नाही भावाची 'हमी'; वाचा काय मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2024 5:08 PM

दिवाळीमुळे (Diwali) राज्यातील अनेक बाजारात (Market) खरेदी बंद आहे. तर काही ठिकाणी कमी प्रमाणात आवक झाल्याने खरेदी झाली आहे. ज्यात आज शुक्रवार (दि.०१) रोजी १५७२ क्विंटलसह परभणी (Parbhani) येथ सर्वाधिक लोकल सोयाबीनची आवक झाली होती. तर पिवळ्या सोयाबीनची (Soybean) उमरखेड येथे सर्वाधिक ५२० क्विंटल आवक नोंदवल्या गेली आहे. 

दिवाळीमुळे राज्यातील अनेक बाजारात खरेदी बंद आहे. तर काही ठिकाणी कमी प्रमाणात आवक झाल्याने खरेदी झाली आहे. ज्यात आज शुक्रवार (दि.०१) रोजी १५७२ क्विंटलसह परभणी येथ सर्वाधिक लोकल सोयाबीनची आवक झाली होती. तर पिवळ्या सोयाबीनची उमरखेड येथे सर्वाधिक ५२० क्विंटल आवक नोंदवल्या गेली आहे. 

राज्यात आज पिवळ्या सोयाबीनला हमीभावापेक्षा कमीच दर मिळाल्याचे दिसून आले. ज्यात लोकल सोयाबीनला परभणी येथे कमीतकमी ४२०० तर सर्वसाधारण ४३५० रुपये दर मिळाला. यासोबतच उमरखेड येथे पिवळ्या सोयाबीनला कमीतकमी ४३०० रुपये तर सर्वसाधारण ४३५० रुपये दर मिळाला. 

तसेच राज्याच्या इतर बाजारसमित्यांमध्ये पिंपळगाव(ब)-औरंगपूर भेंडाळी येथे ४०००, देउळगाव राजा येथे ३९००, तळोदा ३७००, मुखेड ४४००, बार्शी - टाकळी ४१५०, उमरखेड-डांकी येथे ४३५० सर्वसाधारण दर मिळाला.

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील सोयाबीन आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
31/10/2024
परभणीलोकलक्विंटल1572420044504350
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल37300143604000
देउळगाव राजापिवळाक्विंटल112300042003900
तळोदापिवळाक्विंटल33250040003700
मुखेडपिवळाक्विंटल184380044254400
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल325365043504150
उमरखेडपिवळाक्विंटल520430044004350
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल190430044004350
टॅग्स :बाजारशेती क्षेत्रशेतकरीशेतीमार्केट यार्डसोयाबीनमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीदिवाळी 2024