राज्यात आज सकाळपासून सोयाबीनची आवक रोडावल्याचे चित्र होते. शेतकऱ्यांनी विविध बाजारसमितीत आज ८८५ क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणला होता. सर्वाधिक आवक आज नागपूर बाजारसमितीत झाली. क्विंटलमागे शेतकऱ्यांना साधारण ४३६३ रुपये दर मिळाला.
राज्यात आज बहुतांश ठिकाणी पिवळ्या सोयाबीनची आवक झाली होती. शेतकऱ्यांना कमीत कमी ३५०० ते ४५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. हमीभावापेक्षाही कमी भाव मिळत असल्याने शेतकरी सोयाबीनच्या साठवणूकीलाच पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.
विदर्भात सोयाबीनची अधिक आवक असून नागपूर मध्ये ६०२ क्विंटल तर यवतमाळमध्ये १९० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. मराठवाड्यातील आवक घटली आहे. धाराशिवमध्ये आज ७० क्विंटल सोयाबीन आज दाखल झाले. तर परभणीमध्ये २३ क्विंटल पिवळा सोयाबीन विक्रीसाठी आला होता.
जाणून घ्या कोणत्या बाजारसमितीत काय मिळतोय भाव..
जिल्हा | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|
18/03/2024 | ||||
धाराशिव | 70 | 4450 | 4450 | 4450 |
नागपूर | 602 | 4100 | 4450 | 4363 |
परभणी | 23 | 4300 | 4400 | 4300 |
यवतमाळ | 190 | 4500 | 4600 | 4550 |
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) | ||||
17/03/2024 | ||||
अमरावती | 600 | 3500 | 4425 | 4350 |
चंद्रपुर | 68 | 3533 | 4047 | 3800 |
छत्रपती संभाजीनगर | 8 | 4300 | 4400 | 4350 |
लातूर | 1330 | 4425 | 4651 | 4617 |
लातूर | 190 | 4250 | 4600 | 4405 |
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) |