Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Market : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा खिसा रिकामाच; नवा माल येणार तरी दर वाढेना

Soybean Market : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा खिसा रिकामाच; नवा माल येणार तरी दर वाढेना

Soybean Market: Soybean farmers' pockets are empty; Even if new goods arrive, the price will not increase | Soybean Market : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा खिसा रिकामाच; नवा माल येणार तरी दर वाढेना

Soybean Market : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा खिसा रिकामाच; नवा माल येणार तरी दर वाढेना

यंदाही सोयाबीनचा पेरा अधिक होण्याने उत्पादनही वाढणार आहे. नवीन सोयाबीन बाजारात येण्याची वेळ आली तरी अजूनही दरात वाढ नाही.

यंदाही सोयाबीनचा पेरा अधिक होण्याने उत्पादनही वाढणार आहे. नवीन सोयाबीन बाजारात येण्याची वेळ आली तरी अजूनही दरात वाढ नाही.

शेअर :

Join us
Join usNext

सातारा जिल्ह्यातील खरीप पेरणी पूर्णत्वाकडे गेली आहे. त्यातच यंदाही सोयाबीनचा पेरा अधिक होण्याने उत्पादनही वाढणार आहे. नवीन सोयाबीनबाजारात येण्याची वेळ आली तरी अजूनही दरात वाढ नाही.

सातारा बाजार समितीत तर क्विंटलला ४ हजार ६५० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. हमीभावापेक्षाही हा दर २५० रुपयांनी कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खिसा रिकामाच राहत आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वात मोठा असतो. सुमारे तीन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होते. यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक राहते. त्यातच गेल्या काही वर्षांपासून सोयाबीनच्या क्षेत्रात सतत वाढ होत चालली आहे. दरात उतार आलातरी क्षेत्र कमी झालेले नाही.

यावर्षी तर १० हजार हेक्टरवर क्षेत्र गेलेले आहे. त्यामुळे पेरणीची टक्केवारी १२५ पर्यंत गेलेली आहे. तर मागील तीन वर्षांपूर्वी सोयाबीनला क्विंटलला ११ हजारांपर्यंत दर मिळाला होता. त्यानंतर उतार येत गेला.

त्यातच मागील काही महिन्यांपासून सोयाबीनचा दर हा पाच हजारांच्याच खाली आहे. आता खरीप हंगामातील सोयाबीन बाजारात लवकर येईल.तरीही सोयाबीनचा भाव कमीच आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात कमीच रक्कम पडत आहे.

यंदा १४ पिकांच्या हमीभावात वाढ

• जूनमध्ये केंद्रात नवीन सरकार स्थापन झाले. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत १४ पिकांच्या हमीभावात वाढ केली. सोयाबीन पूर्वी हमीभाव क्विंटलला ४ हजार ६०० रुपये होता. आता २९२ रुपयांची वाढ करण्यात आली.

• त्यामुळे नवीन हमीभाव ४ हजार ८९२ रुपये झाला आहे. तर हायब्रीड ज्वारी ३ हजार ३७१, मालदांडी ज्वारी ३ हजार ४२१, बाजरीचा २ हजार ६२५, मक्याचा २ हजार २२५ रुपये हमीभाव झाला आहे.

सातारा बाजार समिती धान्य बाजारभाव क्विंटलमध्ये

धान्यदर 
ज्वारी (शाळू)४,०००-५,५००
ज्वारी संकरित१,८००-२,०००
गहू २१८९२,५००-२,८००
गहू लोकवन२,७००-३,०००
तांदूळ इंद्रायणी३,५००-४,५००
तांदूळ कोलम३,५००-४,५००
तांदूळ आंबेमोहर६,८००-७,०००
तांदूळ बासमती२,८००-८,०००
उडीद७,५००-८,०००
मूग८,०००-१०,०००
तूर६,०००-७,०००
सोयाबीन४,५००-४,६००

चांगल्या दरामुळे सोयाबीन पीक घेऊ लागलो. दोन वर्षात जादा असा दर मिळालाच नाही. यावर्षी नवीन सोयबीन विक्रीस येण्याची वेळ आली आहे. दर क्विंटलला साडे चार हजारांपर्यंतच मिळतोय. किमान हमीभावाएवढा तरी दर सोयाबीनला यावा हीच अपेक्षा आहे. - शांताराम पाटील, शेतकरी. 

हेही वाचा - Poultry Success Story : कुक्कुटपालनातील खान्देशभूषण; कोंबडी पालनात 'या' पद्धतीचा वापर करत वार्षिक लाखोंची उलाढाल

Web Title: Soybean Market: Soybean farmers' pockets are empty; Even if new goods arrive, the price will not increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.