Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Market: सोयाबीनची आवक वाढली आता.. भाव ५ हजारांवर कधी जाणार?

Soybean Market: सोयाबीनची आवक वाढली आता.. भाव ५ हजारांवर कधी जाणार?

Soybean Market: The inward of soybeans has increased now.. When will the price go up to 5000? | Soybean Market: सोयाबीनची आवक वाढली आता.. भाव ५ हजारांवर कधी जाणार?

Soybean Market: सोयाबीनची आवक वाढली आता.. भाव ५ हजारांवर कधी जाणार?

आज ना उद्या सोयाबीनचे भाव वाढतील, या उद्देशाने बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन घरातच ठेवले; परंतु भाव अजूनही वाढलेले नाहीत.

आज ना उद्या सोयाबीनचे भाव वाढतील, या उद्देशाने बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन घरातच ठेवले; परंतु भाव अजूनही वाढलेले नाहीत.

शेअर :

Join us
Join usNext

सांगली: आज ना उद्या सोयाबीनचे भाव वाढतील, या उद्देशाने बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन घरातच ठेवले; परंतु भाव अजूनही वाढलेले नाहीत.

दरम्यान, आता खरीप हंगामात पेरणीसाठी पैशांची अडचण निर्माण झाल्यामुळे भाव पाच हजारांच्या आसपास असला तरी नाइलाज म्हणून शेतकऱ्यांनी ठेवलेले सोयाबीन विक्रीसाठी काढले आहेत. यामुळे बाजार समितीत आवक वाढली आहे.

जिल्ह्यात यावर्षी जूनच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाला. यामुळे खरिपाची पेरणी वेळेवर झाली. काही मोठ्या शेतकऱ्यांची वेळेवर वाफसा न झाल्यामुळे अद्यापही पेरणी सुरू आहे. तर काही ठिकाणी मोठा पाऊस पडून शेतात पाणी थांबल्यामुळे दुबार पेरणी करावी लागत आहे.

एकीकडे पेरणी, तर दुसरीकडे पिकांची आंतरमशागत अशी स्थिती सध्या दिसत आहे. शेतकरी फवारणी, खते शेतामध्ये टाकण्यात व्यस्त आहेत. गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीन पिकाला भाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. कडधान्याचे दर मात्र वाढल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.

बाजारभाव काय? 
धान्य - (प्रतिक्विंटल)

गहू - ३५०० ते ४०००
ज्वारी - ४१०० ते ४८००
मका - २२०० ते २२५०
तूर - ९७५० ते १०५००
हरभरा - ६६०० ते ७०००
मूग - ९२०० ते ९८००
उडीद - ९००० ते ९५००
हुलगा - ७००० ते ७५००
सोयाबीन - ४८०० ते ५०००

कोण काय म्हणतय सोयाबीनचे दर कमी आहेत. सोयाबीनचे दर वाढतील या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री न करता घरातच ठेवले आहे. दोन वर्षांपासूनचा माल शिल्लक आहे. मात्र, भाव वाढले नाहीत. शेतकऱ्यांच्या अडीअडचणींसाठी थोड्याफार प्रमाणात बाजारात मालाची आवक होत आहे. सध्या प्रतिक्विंटल चार हजार ८०० ते पाच हजार रुपये दर आहे. - महावीर पाटील, व्यापारी

सोयाबीनचे उत्पादन घेतल्यापासून वर्षभर प्रतिक्विंटल चार हजार ते पाच हजारांपर्यंत दर राहिले आहेत. यातून सोयाबीनचा उत्पादन खर्चही शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही. कमी भावात सोयाबीन विक्री करणे परवडत नसल्याने विक्री केली नाही. आता ३० पोती सोयाबीन अजूनही शिल्लक आहे. खरीप पेरणी, बियाणे, फवारणी यासाठी खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले आहेत. म्हणून मिळेल त्या दरात सोयाबीन विक्री केली आहे. - सचिन जगदाळे, शेतकरी

Web Title: Soybean Market: The inward of soybeans has increased now.. When will the price go up to 5000?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.