राज्यात मागील महिन्याभरापासून सोयाबीनच्या दरात घसरणच सुरु असून हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. दरम्यान, आज राज्यात सकाळच्या सत्रात एकूण १०२५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली.
पिवळा व लोकल जातीच्या सोयाबीनला आज साधारण ४३०० ते ४६०० एवढा दर मिळाला. आज नागपूर बाजारसमितीत ४६० क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. क्विंटलमागे मिळालेला दर हा कमीतकमी ४१०० रुपये एवढा होता. तर सर्वसाधारण ४३६९ एवढा भाव सोयाबीनला आज मिळाला.
धाराशिव जिल्हा बाजारसमितीत आज १०५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून सर्वसाधारण ४४५० रुपये क्विंटलमागे दर मिळाला. मागील चार दिवसांपासून धाराशिवमध्ये सोयाबीनच्या भावात फारसा बदल झालेला नाही.
पणन विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, बुलढाण्यात आज ३०० क्विंटल पिवळ्या सोयाबीनला ४६२० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तर यवतमाळच्या बाजारसमितीत ११० क्विंटल पिवळ्या सोयाबीनला ४६२० रुपये भाव मिळाला.
जिल्हा | जात/प्रत | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर |
बुलढाणा | पिवळा | 300 | 4600 | 4635 |
चंद्रपुर | पिवळा | 50 | 3400 | 3500 |
धाराशिव | --- | 105 | 4450 | 4450 |
नागपूर | लोकल | 460 | 4100 | 4458 |
यवतमाळ | पिवळा | 110 | 4600 | 4650 |
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) | 1025 |