Join us

लातूरमध्ये पांढऱ्या सोयाबीनला मिळाला क्विंटलमागे असा बाजारभाव, उर्वरित ठिकाणी काय स्थिती?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 4:22 PM

पणन विभागाने सांगितलेल्या माहितीनुसार सोयाबीनला या बाजारसमितीत हमीभाव मिळाला.

राज्यात आज एकूण ५ हजार ३९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून सकाळच्या सत्रात आज लातूरमध्ये पिवळ्या व पांढऱ्या सोयाबीनची आवक झाली. दरम्यान आज केवळ या एकाच बाजारसमितीत पांढऱ्या सोयाबीनला हमीभाव मिळाल्याचे दिसून आले. तर पिवळ्या सोयाबीनला क्विंटलमागे ४४५३ रुपयांचा सर्वसाधारण भाव शेतकऱ्यांना मिळत असल्याचे पणन विभागाने नोंदवले.

राज्यात सध्या सोयाबीनची आवक होत असून शेतकऱ्यांनी साठवलेला सोयाबीन विक्रीसाठी पुन्हा काढला आहे. लातूरनंतर अकोला, वाशिममध्ये सर्वाधिक लोकल सोयाबीनची विक्री होत असून मिळणारा सर्वसाधारण भाव ४४०० ते ४५०० रुपये प्रति क्विंटल एवढा आहे.

कोणत्या बाजारसमितीत कसा मिळतोय सोयाबीनला बाजारभाव?

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
30/05/2024
अकोलापिवळा1670421044804310
बीडपिवळा376426144884455
बुलढाणापिवळा630415044214285
छत्रपती संभाजीनगर---3428043004290
छत्रपती संभाजीनगरपिवळा1440044004400
हिंगोलीपिवळा83422043204270
जळगाव---38360036003600
जालनालोकल15350043504000
जालनापिवळा21440045284500
लातूरपिवळा881420345344453
लातूरपांढरा138450047004600
नागपूरलोकल403410044424357
नागपूरपिवळा139380044504250
नाशिकपिवळा35320044854450
परभणीपिवळा42436143934371
सोलापूर---249450045504550
सोलापूरलोकल22445045054500
वर्धापिवळा193410043754225
यवतमाळपिवळा100426043504310
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)5039

टॅग्स :सोयाबीनबाजारमार्केट यार्ड