राज्यात सोयाबीन बाजारभावाची घसरण सुरुच असून बाजार थंडवल्याचे चित्र आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यात १२२९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून साधारण ४३०० ते ४७०० प्रतिक्विंटल दर मिळत आहे.
हिंगोली बाजारसमितीत ३७५ क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. प्रतिक्विंटल ४३४४ दराने सोयाबीनला भाव मिळाला. प्रजासत्ताकदिनामुळे बहुतांश बाजारसमित्यांमध्ये व्यवहार झाले नाहीत. परिणामी बाजार थंडावला होता. आज राज्यातील बाजारसमितीमध्ये एकूण १२२९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली.
लातूरच्या बाजारसमितीत सोयाबीनला प्रतिक्विंटल ४५०० रुपये सर्वसाधारण भाव मिळाला. आज बाजारसमितीत १६० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.
तुरीकडून दिलासा सोयाबीनकडून निराशा
हमीभावापेक्षा कमीच दर
बहुतांश बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनला मिळणारा प्रतिक्विंटल दर हा हमीभावापेक्षा कमी असल्याचे दिसत आहे.सोयाबीनचा हमी भाव ४६०० रुपये प्रतिक्विंटल आहे. सोयाबीन बाजार थंडावल्याने शेतकऱ्यांची निराशा वाढली आहे. मागील दोन आठवड्यांपासून दर पाच हजारांच्या खालीच असल्याने आहे त्या किमतीत सोयाबीन विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
Soybean Market Today: सकाळच्या सत्रात राज्यात ९९४ क्विंटल सोयाबिनची आवक, काय मिळाला भाव?
कोणत्या बाजारसमितीत किती दर मिळाला?
राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज एकूण १२२९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. पिवळा,पांढरा आणि हायब्रीड अशा सर्व प्रकारच्या सोयाबीनला मिळणारा कमीत कमी भाव ४३०० ते ४७०० रुपये प्रतिक्विंटल असाच आहे.
धाराशिव बाजारसमितीत आज ११० क्विंटल सोयाबीनची आवक झाली.सर्वसाधारण ४५०० रु प्रतिक्विंटल भाव मिळाला. तर यवतमाळ जिल्हा बाजारसमितीत ३७० क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. ४६०० रु प्रतिक्विंटल दर मिळाल्याचे पणन विभागाने नोंदवले.
जिल्हा | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | सर्वसाधारण दर |
बीड | पिवळा | क्विंटल | 50 | 4500 | 4530 |
छत्रपती संभाजीनगर | --- | क्विंटल | 23 | 4300 | 4312 |
छत्रपती संभाजीनगर | पिवळा | क्विंटल | 10 | 4300 | 4300 |
धाराशिव | --- | क्विंटल | 110 | 4500 | 4500 |
धुळे | हायब्रीड | क्विंटल | 39 | 4350 | 4370 |
पिवळा | क्विंटल | 375 | 4225 | 4344 | |
जळगाव | पिवळा | क्विंटल | 20 | 4525 | 4525 |
जालना | पिवळा | क्विंटल | 46 | 4600 | 4700 |
पिवळा | क्विंटल | 160 | 4400 | 4500 | |
नाशिक | पिवळा | क्विंटल | 6 | 4380 | 4412 |
सातारा | पांढरा | क्विंटल | 20 | 4700 | 4800 |
यवतमाळ | पिवळा | क्विंटल | 370 | 4600 | 4620 |